ETV Bharat / state

"मी अक्षय कुमारच्या प्रोडक्शन कंपनीतून बोलतोय" सांगून मुलीची फसवणूक करण्याचा प्रयत्न - Lure Of Work In Film - LURE OF WORK IN FILM

Money Fraud With Girl : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या फिल्म प्रॉडक्शन कंपनीतर्फे तयार होत असलेल्या आगामी चित्रपटात भूमिका देण्याच्या बहाण्यानं मुंबईतील मुलीची ६ लाखांची फसवणूक करू पाहणाऱ्या एका व्यक्तीला जुहू पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Money Fraud With Girl
फसवणूक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 9:55 PM IST

मुंबई Money Fraud With Girl : चित्रपटात भूमिका मिळवून देण्याच्या बहाण्यानं मुलीची आर्थिक फसवणूक करू पाहण्याचा प्रकार मुंबईत समोर आला आहे. आरोपीने तरुणीला सांगितले की, चित्रपटात तिची निवड करण्यापूर्वी तिचा पोर्टफोलिओ बनवला जाईल. यासाठी छायाचित्रकाराकडून तिचे छायाचित्र काढले जाणार आहे. हा फोटोग्राफर बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासाठीही काम करतो. या बहाण्यानं आरोपीनं मुलीकडे सहा लाख रुपये मागितले. आरोपीचे नाव प्रिन्स कुमार सिन्हा (वय 29 वर्षे) असं आहे. त्याने अजून इतर कोणत्या मुलींची फसवणूक केली आहे का? याचा तपास जुहू पोलीस करत असल्याची माहिती जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली आहे.

भेटायला आला आणि जाळ्यात अडकला : पोर्टफोलिओ बनवण्यासाठी आरोपीनं सहा लाखांची मागणी करताच तरुणीला संशय आला आणि तिनं अक्षय कुमारच्या 'पीए'कडे चौकशी केली. त्यावेळी या प्रकरणाला वाचा फुटली. पूजा आनंदाने (वय 28 वर्षे) असे तक्रारदार तरुणीचे नाव असून ती खार येथे राहणारी आहे. मुलीच्या तक्रारीवरून आरोपी रोहन मेहरा उर्फ प्रिन्स कुमार सिन्हा याला जुहू पोलिसांच्या पथकाने जुहू येथील एका स्टार हॉटेलमधून पकडले. जिथे मुलगी आणि तिचे वडील आरोपीला सापळा रचून भेटण्यासाठी आले होते. ही मुलगी खारमध्ये राहते आणि तिला अभिनयाची आवड आहे. ती तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते.

फोटो काढण्यासाठी मागितले 6 लाख रुपये : मुलीला ३ एप्रिल रोजी एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख रोहन मेहरा अशी करून दिली आणि तो अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन कंपनीशी संबंधित असल्याचं सांगितलं. यानंतर मुलीनं या प्रोजेक्टबाबत विचारलं असता हा चित्रपट 'निर्भया' प्रकरण आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित असल्याचं उत्तर देण्यात आलं. त्यानंतर दोघांची भेट झाली. त्या औपचारिक भेटीनंतर आरोपीने मुलीला सांगितलं की, चित्रपटातील भूमिकेसाठी तिची निवड झाली आहे आणि तिला वजन कमी करण्याची गरज आहे. नंतर आरोपीने मुलीला सांगितले की, तिला तिचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे आणि फोटो काढण्यासाठी तिला 6 लाख रुपये द्यावे लागतील.

चौकशी केल्यानं टळली फसवणूक : यानंतर मुलीने तिच्या वडिलांशी याबाबत चर्चा केली. त्यांनी तिला अक्षय कुमारच्या कंपनीतील कोणाकडून तरी व्हेरिफिकेशन करण्याचा सल्ला दिला. यानंतर तरुणीने अक्षय कुमारच्या पर्सनल असिस्टंटशी संपर्क साधला. कंपनीत रोहन मेहरा नावाची व्यक्ती नसल्याचं त्यानं तरुणीला सांगितलं. या नावाचा कोणीही अक्षय कुमारसोबत काम करत नाही. यावर आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर मुलगी आणि तिच्या वडिलांनी जुहू पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर सापळा रचून आरोपीला पोलिसांनी पकडलं.

हेही वाचा :

  1. रामदास तडस यांच्यावर सून पूजा तडस यांची मारहाणीसह आरोपांची सरबत्ती, तडस यांनी सर्व आरोप फेटाळले - Pooja Tadas On Ramdas Tadas
  2. "मधाच्या बोटाला बळी पडू नका...", निवडणूक आयोगानं मतदारांना केलं 'हे' आवाहन - Lok Sabha Election 2024
  3. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून किरण सामंत निवडणूक लढवणार? काय म्हणाले दीपक केसरकर? - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.