ETV Bharat / state

विधानसभा विशेष अधिवेशन 2024 : गुलाबी फेटे अन् चेहऱ्यावर हसू छान छान ; अजित पवारांचे आमदार पोहोचले सदनात, विरोधक रुसले - ASSEMBLY SESSION 2024

आजपासून विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला मुंबईत सुरुवात होणार आहे. आज नव्यानं निवडून आलेले आमदार शपथ घेणार आहे. शपथविधीसाठी अजित पवारांचे आमदार गुलाबी फेटे घालून पोहोचले आहेत.

Assembly Session 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2024, 11:03 AM IST

Updated : Dec 7, 2024, 2:16 PM IST

मुंबई : थोड्याच वेळात विधानसभेच्या विशेष अधिवेशन 2024 ला सुरुवात होत आहे. या अधिवेशनाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी गुलाबी फेटे घालून विधानभवन परिसरात प्रवेश केला. गुलाबी फेटे घातलेल्या आमदारांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत होतं. तर दुसरीकडं भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांमध्येही मोठा उत्साह होता. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदार विधानभवन परिसरात दाखल झाले. विरोधकांचा रुसवा मात्र कायम राहिला. आज विरोधी आमदार शपथ घेणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी : विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली. तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आजपासून महाराष्ट्र विधानसभेचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत आहे.

विरोधी पक्षांचे आमदार आज घेणार नाहीत शपथ : सत्ताधारी आमदारांचा शपथविधी विधानभवनात पार पडत आहे. मात्र दुसरीकडं विरोधी पक्षातील आमदार आज शपथ घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, विरोधकांना उद्या शपथ घ्यावीच लागेल. लोकसभेत 31 जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं. मात्र विधानसभेत हारल्यानंतर ईव्हीएम खराब झालं? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा :

  1. विधानसभा अध्यक्षपद नको, तर कॅबिनेट मंत्रिपदासाठी नेत्यांची लॉबिंग
  2. अजित पवार यांना मोठा दिलासा : बेनामी संपत्ती जप्त प्रकरणात क्लीन चिट
  3. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पराभूत उमेदवारांसोबत अजित पवारांची बैठक, उमेदवारांनी व्यक्त केली मित्रपक्षांबाबत नाराजी

Last Updated : Dec 7, 2024, 2:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.