ETV Bharat / state

अंबेजोगाई-लातूर रोडवर कार-कंटेनरचा भीषण अपघात, चार जण जागीच ठार - Ambejogai Latur road Accident - AMBEJOGAI LATUR ROAD ACCIDENT

Ambejogai Latur road Accident अंबाजोगाई लातूर रोडवर कार आणि कंटेनरचा रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. अपघातात चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला.

Ambejogai Latur road Accident
अंबेजोगाई लातूर रोडवर अपघात (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2024, 11:03 AM IST

बीड Ambejogai Latur road Accident - अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ आज पहाटे स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कारमधील चौघेही जागीच ठार झाले. सर्व मृत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील रहिवाशी आहेत. केदारलिंग शेटकर असे मृताचे नाव आहे. बाकी तीन व्यक्तींची नावे अद्याप समजली नाहीत.



मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशीरा जगलपूर येथील 4 जण स्विफ्ट कारमधून (एमएच 24 एएस 6334) छत्रपती संभाजीनगरला निघाले होते. रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गा जवळ त्यांच्या कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची (एमएच 12 एमव्ही 7188) जोरदार धडक झाली. हा अपघात रविवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास झाला. यावेळी कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला. आतील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

Ambejogai Latur road Accident
अपघातात धडक दिलेला कंटेनर (ETV Bharat Reporter)

मुसळधार पावसात अपघात-अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे एपीआय ससाणे, पीएसआय यादव, सहायक फौजदार बिडगर, हेड कॉन्स्टेबल शेख, कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे चालकांना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्यानं अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Ambejogai Latur road Accident
अपघात झालेली कार (ETV Bharat Reporter)
  • रस्त्यावर आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी -हा रस्ता लातूरकडुन अंबाजोगाईकडे येणारा चौपदरी रस्ता बर्दापूरच्या पुढे दुपदरी करण्यात आला आहे. अचानक निमुळता झालेल्या या रस्त्यावर आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी घेतले आहे. त्यामुळे हा रस्ता लोखंडी सावरगावपर्यंत चौपदरी करावा, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

हेही वाचा-

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.