ETV Bharat / state

"गावाकडं चल माझ्या दोस्ता..." माळरानावर विकसित केलं कृषी पर्यटन केंद्र, देशी-विदेशातील पर्यटक देतात आवर्जून भेट - AGRITOURISM News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 1:47 PM IST

Agritourism Center In Kolhapur : कोल्हापूरमध्ये पाच भावंडांनी मिळून कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं. ग्रामीण भागातील जीवनाचा अस्सल अनुभव घेण्याकरिता या पर्यटन केंद्राला दररोज हजारो पर्यटक भेट देतात.

An agritourism center created by five siblings in Kolhapur, Thousands of agricultural tourists visit every day
कोल्हापूर कृषी पर्यटन केंद्र (ETV Bharat Reporter)

कोल्हापूर : पर्यावरण प्रेमी असलेल्या रघुनाथ चौगुले यांनी 20 वर्षांपूर्वी 'एक झाड एक कुटुंब' ब्रीदवाक्य समोर ठेवून फळांच्या झाडांची लागवड केली. विशेष म्हणजे ही वडिलोपार्जित पडलेली जमीन, शेती पिकवण्यासाठी पाण्याचा स्त्रोत नसल्यानं फोंड्या माळावर ही लागवड केली. कोल्हापूरच्या पन्हाळगडाला लागून असलेल्या माले या छोट्याशा गावात 'आठवण मातीची' हे कृषी पर्यटन केंद्र आकाराला आलं. अल्पावधीतच शेतकऱ्याच्या पोरांनी उभारलेल्या या कृषी पर्यटन केंद्राची महती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरली.

पाच भावंडांनी साकारलं कोल्हापुरात कृषी पर्यटन केंद्र (ETV Bharat Reporter)
  • ऐन कोरोना काळात फळांच्या झाडांची बागेच्या जागी 'तारांकित कृषी पर्यटन केंद्र' करण्याचा पाच भावंडांनी संकल्प केला. आता विदेशातूनही या कृषी पर्यटन केंद्राला भेट देण्यासाठी रोज हजारो पर्यटक या ठिकाणी येतात. येथे येऊन ग्रामीण जीवन आणि आहार संस्कृतीचा अनुभव घेत आहेत.

गावाला आहे ऐतिहासिक महत्त्व- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांची अखेरची भेट झालेल्या पन्हाळगडाजवळील 'माले' या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. गावाच्या पश्चिमेला गावाच्या रक्षणासाठी उभा असलेला पन्हाळगड जणू पाठीराखा म्हणून उभा असल्याचा भास व्हावा, असे हे गाव आहे. ऐतिहासिक पन्हाळगडाच्या कुशीत वसलेलं 'माले' गाव वारणा खोऱ्यातील समृद्ध गाव म्हणून पन्हाळा तालुक्यात प्रसिद्ध आहे. याच गावात रघुनाथ चौगुले यांनी आधुनिक शेती करण्याचा ध्यास मनी बाळगून स्वतःच्या 12 एकर बागायती शेतीतील सहा एकर शेतीवर वृक्ष लागवड केली. प्रसंगी खांद्यावर कावड घेऊन जवळच्या ओढ्यातील पाणी आणून उन्हाळ्याच्या दिवसात त्यांच्या पाच मुलांनी ही झाड सुमारे 200 झाडे जगवली.

ग्रामीण संस्कृतीशी जोडणारे कृषी पर्यटन केंद्र- 2019 सालामध्ये जग आणि देशभरात कोरोनानं थैमान घातलं होतं. यावेळी चौगुले कुटुंबांनं याच फळांच्या बागेत इको फ्रेंडली झोपडी वजा घर बनवून याच ठिकाणी राहायचा निर्णय घेतला. याचवेळी या भावंडांच्या संकल्पनेतून आणि रमाकांत आणि शशिकांत यांचे दाजी राम भोसले आणि कृष्णात भोसले यांच्या सहकार्यानं 'आठवण मातीची' कृषी पर्यटन केंद्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. सोबतीला असलेली आंबा, चिकू, पेरू या फळांची झाड आणि कडुनिंब, दालचिनी, कोरफड अडुळसा या औषधी वनस्पतींचा समावेश असलेलं आणि ग्रामीण संस्कृतीशी जोडणारे कृषी पर्यटन केंद्र आकाराला आलं.

एकमेका सहकार्य करू, अवघे धरू सुपंथ- एकीकडं समाजात शेतीच्या वादातून सख्खे भाऊच एकमेकांच्या जीवावर उठल्याचं चित्र आहे. दुसरीकडं एकत्र कुटुंब पद्धतीत शशिकांत,रमाकांत आणि दिवंगत श्रीकांत हे तिघं भाऊ आणि संगीता भोसले, अर्चना पाटील या भगिनींना एकसंघ ठेवण्यात वडील रघुनाथ चौगुले यांच्या विचारांचा पगडा महत्त्वाचा ठरला. तर चौगुले यांच्या या उपक्रमासाठी त्यांच्या भावकीनेही कृषी पर्यटन केंद्राकडं जाण्यासाठी रस्त्याला कोणतीही आडकाठी लावली नाही. भावकीनं या भावंडांच्या प्रयत्नाला पाठबळ देण्याचं काम केल्यानं या कृषी पर्यटन केंद्राची महती आता जिल्हाभर पोहोचलीय.

साडेतीनशे विदेशी पर्यटकांनी दिली भेट- माले या छोट्याशा गावात मनमुराद राहण्यासाठी आणि बागडण्यासाठी बनवलेलं हे कृषी पर्यटन केंद्र सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचलंय. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका या ठिकाणाहून अनेक विदेशी पर्यटक पंचतारांकित सोयीसुविधा असलेल्या या कृषी पर्यटन केंद्राला भेट देण्यासाठी आवर्जून येतात. गेल्या पाच वर्षात सुमारे साडेतीनशे विदेशी पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिलीय.

हेही वाचा -

  1. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी लुटला चिखल महोत्सवचा आनंद, शाळेच्या 'या' उपक्रमामागे आहे खास कारण - Chikhal festival 2024
  2. कोल्हापुरात विजेच्या धक्क्यानं सरासरी तिघांना गमवावा लागला 'जीव', विद्युत अपघाताबाबत अशी घ्या काळजी - Be careful electrical accidents
  3. जिवा-शिवाच्या बैलजोडीवर चढला शृंगारी साज, कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर बैलांची सवाद्य मिरवणूक - Bendur Festival Kolhapur

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.