ETV Bharat / state

तब्बल 52 तासानंतर भामरागडचा पूर ओसरला; जनजीवन हळूहळू पूर्वपदावर - Gadchiroli Flood News - GADCHIROLI FLOOD NEWS

Gadchiroli Flood News : जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्यानं अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला होता. आता पूर ओसरला असून, त्यामुळं अनेक शहराचा तुटलेला संपर्क पूर्ववत झाला आहे.

Gadchiroli News
भामरागड पूर ओसरला (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 10:23 PM IST

गडचिरोली Gadchiroli Flood News : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भामरागड (Bhamragad) तालुक्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला. तब्बल 52 तासानंतर शहराजवळून वाहणाऱ्या पर्नकोटा नदीचा पूर ओसरला आहे. त्यामुळं शहराचा तुटलेला संपर्क पूर्ववत झाला. त्यामुळं या तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. संपर्क तुटल्यानं अडकून पडलेली प्रवाशी आणि वाहने मार्गस्त झाले.

गडचिरोलीत भामरागड पूर ओसरला (ETV BHARAT Reporter)

पुराचे पाणी ओसरले : भामरागड तालुका शहरापासून एक किलोमीटर अंतरावरच इंद्रवती, पामुलगौतम, पर्लकोटा या तीन मोठ्या नद्यांचा संगम असल्यानं पर्लकोटा नदीवरील पुलावर कोणत्याही क्षणी पाणी येऊ शकतं. त्यात या नद्या महाराष्ट्राच्या सीमेच्या अगदी जवळ छत्तीसगड राज्यातून वाहतात. त्यामुळं छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस झाल्यास पुलावर पाणी येऊन भामरागडचा संपर्क कधीही तुटू शकतो. ही परिस्थिती शनिवारी भामरागड शहरात उदभवली. पुलावरुन पुराचे पाणी शहरात शिरल्यामुळे बाजारपेठा जलमय झाल्या होत्या. आज पावसाने विश्रांती घेतली असून भामरागडच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरील पुराचे पाणी ओसरले आहे.

अनेक घरामध्ये शिरले पाणी : दोन दिवसांपासून बंद असलेला मार्ग आज दुपारी 1.00 वाजता वाहतूकीसाठी पुन्हा सुरू झाला. भामरागडमधील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुरामुळं भामरागडचा संपर्क तुटला होता. गावामध्ये आलेले पुराचे पाणी उतरल्याने मुख्य बाजारपेठ सुरू होण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक घरामध्ये पाणी शिरले होते. तेथील पाणीही मागे हटले तेव्हा आप आपल्या घरात साचलेले चिखल, गाळ स्वतः साफसफाई करुन घेतले आहे. पाऊस मात्र अधून मधून येत आहे. पुर ओसरायला लागला तेव्हा दोन्हीकडे अडकून पडलेले प्रवाशी नदीचं पाणी पूर्णपणे उतरले नसलं तरी लोक जीवाची पर्वा न करता नदी पार करण्याचं धाडस करत होते. प्रशासनाने नदी पार करू नये, असं आवाहन केलं तरी लोक ऐकायला तयार नाहीत. यासाठी भामरागड एसडीपीओ अमर मोहीते, भामरागडचे ठाणेदार दीपक डोम्ब यांनी येथे सुरक्षेसाठी जवानांना तैनात केले होते. त्यामुळं सर्वच जण पाणी पुलाखाली उतरण्याची वाट बघत होते.

पुलावरून पाणी उतरल्यबरोबर : शनिवारी दुपार पासून अडकलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तहसीलदार किशोर बागडे, नायब तहसीलदार तथा नगर पंचायत मुख्याधिकारी प्रकाश पुप्पलवार एसडीपीओ अमर मोहीते आणि ठाणेदार स्वतः हाजर राहून पुलावर जमा झालेला कचरा, गाळ जेसीबीच्या सहय्याने काढला.

हेही वाचा -

  1. गडचिरोली जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस; पर्लकोटा नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला - Gadchiroli Rain
  2. अमरावतीत मुसळधार पाऊस; इमारतीवर कोसळली वीज तर 14 वर्षाचा मुलगा गेला नाल्यात वाहून - Rain in Amravati
  3. शहापूर तालुक्यात पुराचं थैमान, पुरामध्ये अडकलेल्या दिडशेहून अधिक पर्यटकांना एनडीआरएफच्या पथकानं वाचवलं; शेकडो घरं पाण्याखाली - Heavy Rain in Thane

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.