ETV Bharat / state

कर्तबगार महिलांच्या हाती महाराष्ट्राची धुरा! मुख्यसचिवपदी सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला तर प्रधान वनसंरक्षक शोमिता विश्वास - Maharashtra run by women officers - MAHARASHTRA RUN BY WOMEN OFFICERS

Maharashtra run by women officers - राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पुरुष असले तरी राज्याच्या प्रशासनाच्या नाड्या या पूर्णपणे कर्तबगार महिला अधिकाऱ्यांच्या हाती असल्याचं दिसून येतय. राज्याच्या पोलीस महासंचालक या महिला आहेत. राज्याच्या मुख्य सचिव या महिला आहेत. तसंच प्रधान मुख्य वनसंरक्षक या सुद्धा महिला अधिकारी आहेत. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असा योग आलेला आहे. काय आहे या महिला अधिकाऱ्यांचा प्रवास आणि कारकीर्द जाणून घेऊया...

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 2, 2024, 5:20 PM IST

Updated : Aug 2, 2024, 10:17 PM IST

मुंबई Maharashtra run by women officers - महाराष्ट्र राज्याची प्रतिमा पुरोगामी आणि महिलांना सन्मानाची वागणूक देणारी राहिलेली आहे. त्यातच आता राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत योगायोगाने सर्वच सर्वोच्च पदांवर महिलांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची महिलांना सन्मान देणारी प्रतिमा अधिक उजळ झालेली आहे. यामधील पहिल्या अधिकारी आहेत, सुजाता सौनिक.

मुख्य सचिव सुजाता सौनिक (Source ETV Bharat Reporter)

सुजाता सौनिक - सुजाता सौनिक सध्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्या 1987 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्याच्या प्रशासकीय प्रमुखपदी महिला विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक हे गेल्यावर्षी राज्याचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले. पती-पत्नीची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. ही जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्या गृह विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्या हार्वर्ड विद्यापीठाच्या, हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ मधील 2017-2018 च्या माजी टेकमी फेलो आहेत. त्यांनी 2019 मध्ये ही सार्वजनिक आरोग्य, हवामान बदल तसंच आपत्ती व्यवस्थापनाच्या समस्या या विषयावर मित्तल साउथ एशिया इन्स्टिट्यूट मधून फेलोशिप देखील पूर्ण केली आहे. प्रशासनाचा दीर्घ आणि सखोल अनुभव असलेल्या सौनिक यांनी "Deconstructing the Kumbh Mela: Nashik - Trimbakeshwar 2015 - A Public Health Rerspective" हे पुस्तक देखील लिहिलं आहे.

राज्याच्या मुख्य सचिवपदाची धुरा सांभाळताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं आहे की, राज्याचं पावसाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं आहे. या अधिवेशनामध्ये शेतकरी, महिला, सर्वसामान्य जनता यांना न्याय देण्यासाठी करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन. तसंच सर्व लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सहाय्याने राज्यातील जनतेच्या प्रति अतिशय निष्ठेनं, प्रामाणिकपणे आणि शाश्वत काम करण्यावर माझा भर राहील.

गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादर आणि हवेलीतील पश्चिम क्षेत्रीय परिषदेबाबत आज बैठक झाली. सर्व महिलांनी प्रथम शिक्षण पूर्ण केले पाहिजे. आवडत्या विषयात महिलांनी प्रगती करावी. राज्य सरकारकडून सर्व घटकांसाठी योजना सुरू केल्या आहेत. येत्या या महिन्यात लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांची चांगली अंमलबजावणी केली जाईल- सुजाता सौनिक -मुख्य सचिव

रश्मी शुक्ला - राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पहिल्यांदाच एक महिला अधिकारी रश्मी शुक्ला यांची निवड झाली आहे. रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी आयपीएस म्हणून विविध पदांवर काम केलं आहे. राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना फोन टॅपिंग प्रकरणामुळे त्या काही काळ चर्चेत आल्या होत्या. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. यापैकी एक गुन्हा पुण्यात तर एक गुन्हा मुंबईतील कुलाबा येथे नोंदवण्यात आला होता. मात्र फोन टॅपिंग प्रकरणात फिर्यादीद्वारेच क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आल्यानं शुक्ला यांच्या मागचं शुक्लकाष्ठ संपुष्टात आलं. महासंचालकपदी नियुक्ती झाल्यामुळे आपण राज्यातील महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देणार असल्याचं रश्मी शुक्ला म्हणाल्यात. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची असून ती अबाधित राखण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. महाराष्ट्र राज्याची पहिली महिला पोलीस महासंचालक म्हणून काम करताना आपल्याला आनंद आणि अभिमान वाटत असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.

राज्यात तीनही महत्त्वाच्या पोस्ट या महिलाकंडे आहेत. ही महाराष्ट्रासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. पुरोगामी महाराष्ट्र सरकारनं ही खूप मोठा निर्णय घेतला आहे. दृष्टीकोन बदलला तर प्रश्न सोडविण्याचा दृष्टीकोनही बदलतो. ३० टक्के महिलांसाठी राज्यात आरक्षण आहे. त्यामुळे वनविभागातील महिलांसाठी चांगले वातावरण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण आणि समुपदेशन केले जात आहे. महिलांसाठी आणखी चांगले वातावरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे-शोमिता विश्वास, प्रधान मुख्य वन संरक्षक

शोमिता विश्वास यांची मुलाखत (Source- ETV Bharat)

शोमिता विश्वास - राज्यातील वनसंपदा ही अतिशय व्यापक असून वनांची जबाबदारी सांभाळण्यासाठीही तितकीच कणखर व्यक्ती असायला हवी. राज्यातील तिसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या प्रधान मुख्य वन संरक्षक या पदावर सुद्धा 1988 मधील आयएफएस बॅचच्या शोमिता विश्वास या रुजू झाल्या आहेत. राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. या पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी शोमीता विश्वास या 'महा कॅम्पा'च्या मुख्य कार्य अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. केंद्रीय आणि राज्याच्या स्तरावर अनेक महत्त्वाच्या पदांवर विश्वास यांचा प्रशासकीय अनुभव अतिशय दांडगा आहे. राज्यातील वनांचा विकास आणि वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि जतन करण्यावर आपला अधिक भर असणार आहे. राज्यातील जनता प्रशासकीय अधिकारी यांच्या सहकार्याने आपण वन विभागात शाश्वत काम करणार असल्याचं विश्वास यांनी सांगितलं.

  • महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन अत्यंत महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर महिलांना संधी प्राप्त झाली आहे. राज्यातील प्रमुख प्रशासकीय पदांवर महिला अधिकारी विराजमान झाल्यानंतर त्यांचा आजवरचा असलेला प्रशासकीय अनुभव त्याशिवाय त्यांची संवेदनशीलता राज्यातील जनतेच्या विविध प्रश्नांना न्याय देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा-

Last Updated : Aug 2, 2024, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.