ETV Bharat / state

लाडकी बहीण योजनेवरुन आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल; शक्ती कायद्यावरुन सरकारवर साधला निशाना - Aditya Thackeray On Government - ADITYA THACKERAY ON GOVERNMENT

Aditya Thackeray On Government : उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगरला भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर मोठा हल्लाबोल केला. आम्ही शक्ती कायदा आणला, तेव्हा या सरकारनं शक्ती कायद्याला मंजूर केलं नाही, आता मात्र लाडकी बहीण योजना आणत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

Aditya Thackeray On Government
आमदार आदित्य ठाकरे (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 5:15 PM IST

Updated : Aug 26, 2024, 8:05 PM IST

लाडकी बहीण योजनेवरुन आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल (Reporter)

छत्रपती संभाजीनगर Aditya Thackeray On Government : आम्ही शक्ती कायदा 2021 मध्ये राज्यपालांकडं पाठवला, त्यांनी केंद्राकडं पाठवला मात्र मंजूर केला नाही. महिलांना शक्ती देणारा कायदा आणला नाही, अन् आता मात्र सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, अशी टीका ठाकरे गटाचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली. निवडणूक आली की असे खेळ केले जातात. कुठलीही निवडणूक जवळ नसताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांना मोठी मदत दिल्याची घोषणा केली, मात्र मदतीचे 15 रुपये, 20 रुपये आले, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.

शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाले : आता महिलांना किती मिळणार बघा. या दोन वर्षात महिलांची आठवण नाही आली, आज लाडकी बहीण योजना सरकारनं आणली. 10 वर्षांपूर्वी 15 लाखांवर देऊ बोलत होते, आज दीड हजारावर आले, हे खोटे आहेत. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, त्यांना अतिरेकी म्हणाले. आता म्हणतात आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, असं देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

मशाल उजेड आणेल : जर्मनीमध्ये नौकरी देणार म्हणे, युवकांना काही गुवाहाटी इथं जायचं नाहीये. मात्र माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे. रोजगार मिळाला पाहिजे, मी हक्कासाठी लढणारंच. मात्र राज्यात सध्या माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना चालू आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी संत एकनाथ रंग मंदिर इथं झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली. "अयोध्या सारख्या ठिकाणी हरले, कारण त्यांनी स्थानिकांना डावललं. तिथले पुजारी देखील गुजरातमधून आणण्याचा प्रयत्न आहे. परिक्षांमधील घोटाळे आहेत, कितीवेळा आंदोलन करायचं, एमपीएससी म्हणते आम्ही वेळ बदलणार नाही. ही निवडणूक थोडी आहे, ज्याचा वेळ बदलणार नाही. पोलीस भरतीत लाखो मुलं आले, त्यांची सोय नाही. किती जणांना नोकरी मिळेल, कुठं मिळेल, त्यांची व्यवस्था कशी असेल, माहिती नाही. कामगार कायदे बदलायचे आहेत. आपल्या मुलांना रस्त्यावर दगडफेक करण्यासाठी वापरणार आहेत का?" असा संतप्त प्रश्न उपस्थितीत करत "या अंधारात मशाल उजेड आणू शकते," असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

असे भाऊ हवे आहेत का? : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार वाढले आहेत. राज्यातील सत्ताधारी पक्षातील दोन आमदार यांच्याबाबत आश्चर्य वाटत आहे. पहिले अब्दुल सत्तार सारखा आमदार त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीवर बोललं. त्यांच्यावर कारवाई तर नाहीच उलट त्यांना मंत्रीपद आणि पालकमंत्री पद दिलं जाते. असा भाऊ लाडका कसा होऊ शकतो. दुसरे संजय राठोड म्हणतात अशा घटना होत असतात. असे लोक मंत्रिमंडळात आहेत. असे भाऊ लाडके होऊ शकतात का? बिलकीस बानो यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांचा सत्कार करणारा भाजपा लाडका भाऊ कसा होईल. आपलं आंदोलन विरोध म्हणून नव्हतं, तर विकृती विरोधात आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

राज्यातील लोकांना काय मिळालं : "पन्नास खोके वाल्यांना त्यांच्या मनातलं मिळालं. कोणाला गाड्या मिळाल्या, कोणाला टोल नाका मिळाला, तर कोणाला दारूचे ठेके मिळाले आहेत. पण लोकांना महाराष्ट्र म्हणून जे मिळायला पाहिजे ते मिळालं का? राज्याची प्रगती झाली का? तर नाही. आम्ही संविधान बचाव यात्रा हाती घेतली, आता संविधान रक्षण ही गरज आहे. घटनाबाह्य सरकार आहे, न्यायालय निकाल देईल, त्याची अपेक्षा आहेच. कोविड झाल्यावर निवडणूक का नाही? कारण ते घाबरतात जनतेला, मागच्या दारातून येणाऱ्या ठेकेदारांना घाबरतात. जुने रस्ते चांगले करायचे नाहीत, नवीन कामं कशाला. निकाल काही लागला तरी आपल्याला तयारीला लागावं लागेल. आपल्या स्वाभिमानाची लढाई आहे. सुवर्णकाळ आपण दाखवत होतो तो काळ पुन्हा आला पाहिजे," असं देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. दिशा सालीयन प्रकरण चिघळलं; आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलबाहेर भाजपा आणि उबाठा गटात तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज - Dispute Raised Between BJP And UBT
  2. 'मनसे हा सुपारीबाज पक्ष...,' आदित्य ठाकरेंचा टोला - Aditya Thackeray Pune Visit
  3. वरळी मतदारसंघात कमळ फुलू देणार नाही, आदित्य ठाकरेंचा निर्धार - Aditya Thackeray On BJP

Last Updated : Aug 26, 2024, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.