मुंबई Tiger Shroff Inauguration Sculpture : मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकाच्या बाहेर प्रचंड गर्दी असते. मुंबईतील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी अंधेरी रेल्वे स्थानक आहे. अंधेरी पश्चिमेला फलाट क्रमांक एकच्या प्रवेशद्वाराजवळ साकरलेल्या आकर्षक शिल्पाचं उदघाटन आज सायंकाळी प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या हस्ते करण्यात आलं. हे शिल्प अंधेरी पश्चिमेला गेल्या दहा वर्षांत केलेल्या विविध विकास कामांचं प्रतीक आहे.
अंधेरीच्या सौंदर्यात पडणार भर : या शिल्पाची संकल्पना भाजपाचे स्थानिक आमदार अमित साटम (Amit Satam) यांची असून प्रख्यात कलाकार रुबल नागी यांनी हे शिल्प साकारलं आहे. चित्रपट निर्माते आनंद पंडित आणि चित्रपट निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक पंडित हे देखील यावेळी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी आमदार अमित साटम यांच्या कार्याचा गौरव केला.अंधेरीची महती या शिल्पातून प्रदर्शित केल्यानं अंधेरीच्या सौंदर्यात भर पडणार आहे. तर हे शिल्प साकारण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागला आहे.
अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाच्या सुंदर शिल्पाच्या उद्घाटनासाठी मला आमंत्रित केलं, याचा मला खूप आनंद आहे. मला मुंबई आवडते आणि मला अंधेरी देखील आवडते. कारण मी माझ्या शूटिंगसाठी येथे वारंवार येतो. आज येथे आल्याने मला खूप आनंद झाला आहे. - टायगर श्रॉफ, अभिनेता
शिल्पावर मुंबई सेल्फी पॉईंट : अंधेरी (प) स्थानका बाहेरील स्थापित केलेल्या शिल्पावर अंधेरीतील प्रतिष्ठित अश्या गिल्बर्ट टेकडी, इस्कॉन मंदिर, जुहू बीच आदी प्रतिष्ठित ठिकाणांचा समावेश असून मुंबई सेल्फी पॉईंट त्यावर पेंट केली आहे.
हेही वाचा -