ETV Bharat / state

मोबाईल अन् १०० रुपयांसाठी अल्पवयीन मुलाचं अपहरण करत हत्या; तीन आरोपींना अटक - Minor Kidnapped and Killed

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2024, 9:45 PM IST

Updated : Aug 29, 2024, 10:23 PM IST

Minor Kidnapped and Killed : अल्पवयीन मुलाचं अपहरण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत समोर आली. केवळ शंभर रुपये आणि मोबाईल फोनसाठी हत्या केल्याची माहिती आता पोलीस तपासात समोर आली. वाचा सविस्तर बातमी....

Minor Kidnapped and Killed Bhiwandi
संग्रहित छायाचित्र (Source : ETV Bharat File Photo)

ठाणे Minor Kidnapped and Killed : १३ वर्षाच्या मुलानं रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी चालकाला हात दाखवत बाजारापर्यत सोडण्याची विनंती केली. मात्र, त्या मुलाच्या हातात स्मार्ट मोबाईल फोन बघताच दुचाकी चालकाची नियत फिरली. त्या मुलाला लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसवत त्याचं अपहरण केलं. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन त्याच्याकडील मोबाईल आणि १०० रुपये रोख हिसकावून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

आरोपी अटकेत : ही घटना भिवंडी तालुक्यातील पाच्छापूर गावानजीक असलेल्या हर्याचापाडा परिसरात घडली. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात अपहरण, हत्या आणि पुरवा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना शिताफीनं अटक केली. नितीन वाघे (वय ४०), पद्माकर भोईर (वय, २०) आणि अजय मांजे ( वय २१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून हे तिघेही भिवंडी तालुक्यातील पडघानजीक असलेल्या चावा गावचे रहिवासी आहेत.

पैसे आणि मोबाईलसाठी हत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अल्पवयीन मुलगा हा भिवंडी तालुक्यातील हर्याचापाडा येथे राहत होता. तो शहापूर तालुक्यातील एका आश्रम शाळेत ९ विच्या वर्गात शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झाल्यानं आईनं दुसरा विवाह केल्यानं त्याला आश्रम शाळेत शिक्षणासाठी ठेवलं होतं. काही महिन्यापूर्वीच त्याच्या आईनं त्याला रेडमी कंपनीचा १५ हजाराचा स्मार्ट फोन घेऊन दिला होता. त्यातच रक्षा बंधनाचा सण साजरा करण्यासाठी तो आश्रम शाळेतून हर्याचापाडा येथे आपल्या काकाकडं आला होता.

अपहरण करुन हत्या : रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी म्हणजे १८ ऑगस्टला पाच्छापूर येथील बाजारात राखी आणि काही साहित्य खरेदीसाठी त्याच्या काकानं मृत मुलाला १०० रुपये दिले होते. मृत मुलगा त्या दिवशी सकाळी ९ वाजल्याच्या सुमारास राखी खरेदीसाठी घरातून निघाला होता. त्यानंतर राखी खरेदीसाठी १८ ऑगस्ट रोजी घरून गेलेला मुलगा त्या दिवशी परत आला नव्हता. शिवाय रक्षाबंधनच्या दिवशी १९ ऑगस्ट रोजी तो आला नसल्याचं पाहून काकाला वाटले की, मुलगा आश्रम शाळेत परत गेला असावा, त्यामुळं काकानं शाळेच्या अधिकाऱ्यांकडं चौकशी केली असता, त्यांनी तो परतला नसल्याचं सांगितलं.

पोलिसात दिली होती तक्रार : मृत मुलाचे काका शांता वळवी यांनी २१ ऑगस्टला पडघा पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाला असून त्याचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन पडघा पोलिसांनी गावापासून ते बाजारपेठकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका फुटेजमध्ये एका दुचाकीवरून तीन तरुणांमध्ये बसून जात असताना मृत मुलगा दिसला. त्यानंतर दुचाकी चालकाची ओळख पटवली असता तो नितीन वाघे असल्याच समोर येताच पोलिसांनी २४ ऑगस्ट रोजी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडं चौकशी केली. मुलाचे अपहरण करून त्याची वाडा तालुक्यातील एका गावातील माळरानात गळा आवळून हत्या करत त्याच्या जवळीत मोबाईल व १०० रुपये घेऊन त्याचा मृतदेह झाडाझुडपात फेकून दिल्याचं आरोपीनं कबुली दिली.

आरोपींना पोलीस कोठडी : दरम्यान, २५ ऑगस्ट रोजी अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेहाचा शोध घेण्यासाठी आरोपीसह पोलीस पथक वाडा तालुक्यातील एका गावातील माळरानात पोहचलं. त्यांना मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना पडघा हद्दीतून अटक करत न्यायालयात हजर केलं असता ३० ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी दिली.

पोलिसांनी दिली माहिती : वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळा कुंभार म्हणाले, "आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या मुलानं दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेतल्याचं आढळलं. त्याचा शोध घेऊन चौकशी केली. त्यानं आणि एका सहआरोपीनं मोबाईल फोन आणि १०० रुपयासाठी एका निर्जनस्थळी मुलाची हत्या केल्याचं कबूल केलं..मृत मुलाचा वाडा तेथील शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला."

हेही वाचा -

  1. नेरुळमधील दोन रियल इस्टेट एजंटच्या हत्येचं उकललं गूढ; सुपारी देत एकाची हत्या, तर दुसऱयाचा केला 'असा' गेम - Nerul Double Murder Case
  2. पुण्यात तरुणीचा निर्घृण खून, हातपाय कापून धड फेकलं नदीपात्रात, नागरिक हादरले - Found Girls Body Parts In Pune
  3. विरार चंदनसार येथील पेट्रोल पंप मालकाची हत्या, आरोपी फरार - Virar murder case

Last Updated : Aug 29, 2024, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.