ETV Bharat / state

एकाच कुटुंबातील 5 जण भुशी धरणात गेले वाहून, बचावकार्य सुरू - 5 people washed in Bhushi Dam

5 people washed in Bhushi Dam : लोणावळ्यात धक्कादायक घटना घडली आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी गेलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याचा दुर्दैवी प्रकार भुशी डॅमच्या पाठीमागं असलेल्या जंगलातील धबधब्यावर घडला आहे.

5 people washed in Bhushi Dam
भुशी धरणात पाच जण गेले वाहून (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 6:34 PM IST

लोणावळा 5 people washed in Bhushi Dam : लोणावळ्यात पर्यटनासाठी गेलेले पाच जण भुशी धरणात वाहून गेले आहेत. भुशी डॅमच्या पाठीमागील जंगलातील धबधब्यावर ही घटना घडली आहे. यामध्ये लहान मुलांसह महिलेचा समावेश आहे. सध्या वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध सुरू आहे.

4 लहान मुलांसह 1 महिलेचा समावेश : लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरातील बॅकवॉटर धबधब्यात पुण्यातील सय्यद नगर भागातील पाच जणं पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात भुशी धरणात बुडाली. पाण्याचा अंदाज न आल्यानं ते पाण्यात वाहून गेले. लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जण भुशी डॅममध्ये वाहून गेल्यानं भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये 4 लहान मुलांसह 1 महिलेचा समावेश आहे. हे सर्वजण पुण्यातील रहिवासी आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागं असलेल्या डोंगरातील वॉटर फॉलवर अन्सारी कुटुंब वर्षाविहाराचा आनंद लुटत होते. पाय घसरुन हे सर्वजण वाहून गेल्याची भिती आहे. या धबधब्याचं पाणी भुशी धरणात येते.

बचावकार्य सुरू : स्थानिक प्रशासन, आपत्कालीन विभागानं घटनास्थळी तत्काळ धाव घेत शोधमोहिम सुरू केली आहे. पर्यटकांना शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या पाच जणांच्या शोधासाठी संपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. शिवदूर्ग मित्र मंडळ आणि शहर पोलिसांच्या मदतीनं शोधमोहिम राबवली जात आहे. ही घटना घडताना पर्यटकांनी पाहिली. त्यांच्या माहितीनुसार, कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, पाण्याच्या वेगामुळं त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. या घटनेमुळं स्थानिक तसंच पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

हे वाचलंत का :

  1. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्याकडं प्रस्थान; राज्यभरातून हजारो वारकऱ्यांची उपस्थिती - Ashadhi Wari 2024
  2. शरद पवारांसारखे नास्तिक वारीत कसे चालणार? भाजपाची टीका - BJP criticizes Sharad Pawar
  3. उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या चित्रामुळेच... देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर - Sanjay Raut News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.