ETV Bharat / state

मुंबई पोलिसांचे 32 जीगरबाज 'श्वान' पेलतात मायानगरीच्या सुरक्षेची जबाबदारी; जाणून घ्या कसं चालते पोलीस दलातील श्वान पथकाचं काम ? - Mumbai Cops Dog Squad

Mumbai Cops Dog Squad : मायानगरी मुंबईत तब्बल दीड कोटी नागरिक राहतात. या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांवर आहे. मात्र मुंबई पोलिसांच्या मदतीला 32 श्वान आपल्या प्राणाची बाजी लावून आपली सेवा बजावतात. मुंबई पोलीस दलातील श्वान पथक देशभरात चांगलंच चर्चेत असते.

Mumbai Cops Dog Squad
मुंबई पोलीस दलातील श्वान पथक (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 2:01 PM IST

मुंबई Mumbai Cops Dog Squad : मायानगरीतील सव्वा कोटींच्या लोकसंख्येमागं 52 हजार मुंबई पोलीस दलातील जवान आणि अधिकारी कार्यरत आहेत. इतक्या जास्त लोकसंख्या असलेल्या मायानगरी मुंबईसाठी मुंबई पोलीस दलाची क्षमता तूटपुंजी असली, तरी मुंबई पोलिसांच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी मदतीला असते ते श्वान पथक. या श्वान पथकाबाबत आणि त्यांच्या कामगिरीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. मुंबई पोलीस दलातील श्वान पथक त्यांच्या कामगिरीमुळे देशभरात लोकप्रिय आहे.

श्वान पथकावर सुरक्षेची मोठी जबाबदारी : मुंबई पोलिसांच्या श्वान पथकाला वर्षभरात 50 ते 60 कॉल येतात. मुंबई पोलिसांच्या 52 हजार फौजफाट्यासह 32 श्वानांवर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. मुंबई पोलिसांच्या श्वान पथकाला 2023 या वर्षात 58 कॉल्स आले असून या वर्षी जून महिन्यापर्यंत 20 कॉल्स ड्रग्जसाठी आले आहेत. या वर्षी जूनपर्यंत फक्त 1 कॉल आला आहे. मुंबई पोलीस दलात हवालदारांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत 52 हजार कर्मचारी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत.

मुंबई पोलीस दलात या वर्षी स्थापन्यात आलं श्वान पथक : मुंबई पोलिसांकडं क्राईमसाठी 8 श्वान आहेत. त्यातील तीन श्वान पुणे इथं प्रशिक्षण घेत आहेत. स्वतंत्र भारताला पहिल्या दिवसापासून पोलिसांची गरज होती. मात्र दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागली. त्याचं गूढ उकलण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला. श्वान पथकाची निवड हा देखील याचाच एक भाग आहे. श्वान गुन्हा घडलेल्या ठिकाणी जाऊन वास घेऊन गुन्हेगारांचा माग काढतात. मुंबई पोलीस दलात डॉग स्क्वाड म्हणजेच श्वान पथक 1967 मध्ये स्थापन करण्यात आलं. तेव्हापासून श्वान पथक कार्यरत आहे.

पोलिसांना का आहे श्वान पथकाची गरज : मुंबई पोलिसांना या विभागाची गरज का पडली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरं तर, मानवी शरीरातून एका तासात 40 हजार पेशी बाहेर पडतात आणि अंमली पदार्थांमध्ये 105 प्रकारचे वास असतात. त्यांचा शोध घेणं हे मानवासाठी अवघड आहे. अशा परिस्थितीत श्वान हा एकमेव असा प्राणी आहे ज्याचा वास घेऊन ते लक्षात ठेवण्याची विशेष क्षमता आहे. श्वान भिन्न वास ओळखू शकतो आणि तो आपल्या मेंदूत साठवून ठेवू शकतो. मुंबई पोलिसांकडं श्वान पथकाचे दोन विभाग आहेत. पहिला विभाग गुन्हे शाखेच्या अंतर्गत येतो. ज्यामध्ये नार्कोटिक्स आणि क्राईम स्पॉट ट्रॅकिंगसाठी 8 श्वान आहेत. तर 24 श्वानांचा वापर बॉम्ब साईट आणि व्हीआयपी हालचाली तपासण्यासाठी केला जातो.

कुठून आणि कसे खरेदी केले जातात श्वान ? : श्वान खरेदी करताना कोटेशन मागवलं जाते. किमान तीन कोटेशन मागवले जातात. राज्य सीआयडी पुणे त्याची कार्यपद्धती ठरवते. खरेदीच्या वेळी श्वानाचं वय 45 दिवस ते 65 दिवसांच्या दरम्यान असावं लागते. KCI (Kennel Club of India) किंवा INKC क्लब (National Kennel Club of India) यांच्यामार्फत श्वान खरेदी केले जातात. त्यानंतर त्यांना पुण्यातील शिवाजी नगर इथं प्रशिक्षणासाठी पाठवलं जाते. तिथं त्यांना राज्य CID अंतर्गत प्रशिक्षण दिलं जाते. 9 महिन्यांच्या प्रशिक्षणापैकी 3 महिने त्यांना शिष्टाचार शिकवले जातात. उर्वरित 6 महिने अंमली पदार्थ आणि स्फोटक पदार्थ ओळखण्याचं प्रशिक्षण दिलं जाते.

काय आहे श्वानांचं खाद्य ? : श्वानांचा आहार पशुवैद्यकाद्वारे ठरवला जातो. रॉयल कॅनन मॅक्सी अ‍ॅडल्ट फूड 15 किलोच्या बॅगमध्ये येते. ते खाद्य श्वानांना दिलं जाते. त्यांना दररोज 750 ग्रॅम खाद्य दिले जाते. एका श्वानाला एका महिन्यात 21 किलो अन्न दिले जाते. पोलीस दलातील त्यांच्या सेवेचे एकूण आयुष्य 10 वर्षे आहे आणि नंतर ते निवृत्त होतात.

कोणत्या जातीचा आहे श्वान ? :

1) लिओ - हा डॉबरमन प्रजातीचा श्वान आहे, त्याचं वय 5 वर्षे 11 महिने आहे. गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर रोजी पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या 4 वर्षाच्या मुलाला शोधण्यात या श्वानानं मदत केली. त्याच्या टी-शर्टचा वास घेत त्यानं आरोपीचा माग काढला. पेल्हार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरणाचा गुन्हा सोडवण्यासाठी लिओनं मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयालाही मदत केली होती.

2) जेसी - बेल्जियन शेफर्ड मेलोनीस हा श्वान ट्रॅकर असून त्याचं वय 5 वर्षे 8 महिने आहे. गेल्या वर्षी 28 सप्टेंबर रोजी मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरणाचा गुन्ह्याची उकल करण्यासाठी त्यानं मदत केली. यावर्षी 5 मे रोजी मलबार हिल येथे दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्याची उकल जेसीने केली.

3) व्हिस्की - ही जर्मन शेफर्ड जातीची असून तिचे वय 4 वर्षे आहे.

4) माया - ही जर्मन शेफर्ड असून 4 वर्षे इतके वय आहे. गेल्या वर्षी 23 ऑगस्ट रोजी जुहू पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात मायानं आरोपीच्या पलायनाची दिशा सांगितली. ज्यामुळे आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करण्यात मदत झाली. तसेच गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात मायानं पोलिसांना मदत केली.

5) हनी - ही जर्मन शेफर्ड असून ती 4 वर्षे इतकी वयाची आहे.

शेरा, ब्रुनो आणि योद्धा हे तीन भाऊ (प्रशिक्षणार्थी)

6) शेरा -हा डॉबरमॅन 8 महिन्यांचा श्वान क्राईम स्पॉटवर जाऊन ट्रॅकरचं काम करणार

7) ब्रुनो - हा डॉबरमन जातीचा श्वान असून त्याचं वय 8 महिने इतकं आहे.

8) योद्धा - हा डॉबरमॅन असून त्याचं वय 8 महिने आहे.

श्वान पथकात एकूण 24 जवान : श्वान पथकात एकूण 24 जवान असून त्यापैकी 16 श्वान हँडलर आहेत. श्वानांबरोबरच या हँडलरलाही प्रशिक्षण दिलं जाते. श्वानाला पहिले काही महिने शिष्टाचार शिकवले जातात. त्यानंतर त्यांना ज्या कामासाठी वापरायचं आहे, त्याचं प्रशिक्षण दिलं जाते. "आम्ही श्वानांना वेळोवेळी प्रशिक्षण देत असतो आणि त्यांच्या आरोग्याकडं विशेष लक्ष देतो," असं पोलीस उपायुक्त अमोघ गावकर यांनी सांगितलं आहे. श्वान पथक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक जॉन गायकवाड सांगतात की, "मुंबईतील कोणत्याही पोलीस ठाण्यातून फोन आला तर जावे लागते. काही वेळा पोलीस नियंत्रण कक्षाला फोन येतो. त्यानंतरही श्वानाला घेऊन घटनास्थळी पोहोचावे लागते."

हेही वाचा :

  1. फिरायला गेलेली महिला समुद्राच्या भरतीमुळे बुडाली, जीवाची बाजी लावून पोलिसांनी वाचविले प्राण - Mumbai Police news
  2. शिखर बँक घोटाळा प्रकरण : मुंबई पोलीस आणि ईडी विशेष न्यायालयात आमने सामने - Shikhar Bank Scam Case
  3. मुंबई पोलिसांच्या हाती तुरी देत तीन कुख्यात आरोपी रेल्वेतून उड्या टाकत फरार; उत्तर प्रदेशातून आणत होते मुंबईत - Accused Escaped Jumping from Train

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.