ETV Bharat / state

घोडा गाडी शर्यतीत झाला वाद: डोक्यात दगड घालून युवकाला संपवलं, 'तिकडी' अटकेत - Youth Murder In Kolhapur

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 5, 2024, 7:36 AM IST

Youth Murder In Kolhapur : घोडा गाडी शर्यतीत झालेल्या वादातून एका युवकाचा खून करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना इचलकरंजी शहरात गुरुवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयित मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

Youth Murder In Kolhapur
पकडण्यात आलेले आरोपी (Reporter)

कोल्हापूर Youth Murder In Kolhapur : घोडा गाडी शर्यतीत झालेल्या वादातून इचलकरंजीतील शहापूर इथल्या शाळेच्या पाठीमागं एका अल्पवयीन युवकाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. सुशांत दीपक कांबळे ( वय 18 रा. आसरा नगर ,इचलकरंजी) असं खून झालेल्या अल्पवयीन युवकाचं नाव आहे. खून करुन पसार झालेल्या तीन संशयीत आरोपींना अवघ्या काही तासातच बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Youth Murder In Kolhapur
सुशांत दीपक कांबळे (Reporter)

तोंडावर, पाठीवर, मांडीवर वार करुन खून : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरामधील शहापूर इथं असलेल्या डॉ. सरोजिनी नायडू विद्यालय क्र. 43 च्या मागं गुरुवारी सकाळच्या सुमारास मृत सुशांत दीपक कांबळे या अल्पवयीन तरुणाचा खून झाल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला. यावेळी मृतदेहावर अज्ञात संशयित आरोपींनी तोंडावर, पाठीवर, मांडीवर वार करुन खून केल्याचं निदर्शनास आलं.

घोडा गाडी परत मागितल्याचा वाद : पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात पाठवला. घटनेचं गांभीर्य ओळखत तपासाची चक्रं फिरवण्यास सुरुवात केली. सुशांत कांबळे याच्या नातेवाईकास आणि परिसरात पोलिसांनी चौकशी केली. हा खून पूर्व वैमन्यस्यातून झाल्याचं स्पष्ट झालं. गेल्या काही महिन्यांपूर्वी घोडा गाडी शर्यतीत वाद वाद झाला होता. यावेळी घोडा गाडी परत मागतल्याच्या वादातून संशयित आरोपी अतिश उर्फ टक्या दत्तात्रय नेटके (वय वर्ष 19 रा. सहकार नगर, इचलकरंजी), आर्यन सरदार चव्हाण ( वय 21 राहणार गणेश नगर, इचलकरंजी) आणि बाळू उर्फ प्रदीप पारस यादव (वय 20 राहणार जे के नगर शहापूर) यांनी केल्याचा संशय पोलिसांना आला.

अवघ्या काही तासात संशयित आरोपींना ठोकल्या बेड्या : पोलिसांच्या दोन पथकांनी तत्काळ या संशयीत आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली. तिन्ही संशयित कोल्हापूर शहरातील राजाराम कॉलेजच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या मैदानात असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजलं. दरम्यान पोलिसांनी माहितीची पडताळणी केली असता, तिघंही संशयित आरोपी तिथं लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या पथकानं या तिघांना अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या. संशयित आरोपींची चौकशी केली असता, "आतिश दत्तात्रय नेटके आणि मृत सुशांत दीपक कांबळे हे दोघं एकमेकांचे मित्र असल्याचं समोर आलं. गेल्या काही दिवसांपूर्वी दोघांनी घोडागाडी परत मागतल्याच्या कारणावरून त्यांच्या मनात राग होता. त्यातच घोडा गाडी शर्यती झालेल्या जुन्या वादावरून ते संतप्त होते. त्यामुळे गुरुवारी रात्रीच्या सुमारास शहापूर येथील डॉ. सरोजिनी नायडू विद्यालय इथं सुशांत कांबळे थांबलेला पाहून संशयित तिन्ही आरोपी एका दुचाकीवरुन तिथं आले. सुशांत कांबळे याच्यावर धारदार शस्त्रानं वार करत खून केल्याची कबुली संशयित आरोपींनी दिली. यामुळे तिन्ही संशयितांना ताब्यात घेऊन शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला," अशी माहिती पोलिसांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यात दहशत : गेल्या काही महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात टोळी युद्धातून आणि पूर्व वैमन्यस्यातून खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली. भर चौकात दिवसाढवळ्या खून होत आहेत. गेल्या काही महिन्यात झालेला हा चौथा खून असून यापूर्वी रंकाळा आणि संभाजीनगर परिसरात अशाच पद्धतीनं टोळी युद्धातून खुनाच्या घटना घडल्या होत्या. तर दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या राजारामपुरी भागात देखील एकाचा खून झाला होता. या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत, तोच जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात पूर्व वैमन्यस्यातून झालेल्या या खुनामुळे नागरिकांमध्ये सध्या दहशत निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

  1. प्रेयसीचा खून केल्यानंतर दिला स्पर्धा परीक्षेचा पेपर; आनंदवन येथील हत्याकांडात आरोपीचा खुलासा - Girlfriend Murder Case Chandrapur
  2. "खून का बदला खून"...; भर रस्त्यात गुन्हेगाराची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या, चार मारेकऱ्यांना अटक - Thane Murder Case
  3. मरळवाडीच्या सरपंचाची गोळ्या घालून हत्या; पोलीस घेताहेत मारेकऱ्यांचा शोध - Bapu Andhale Murder Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.