ETV Bharat / sports

हॉटस्टार, जिओ सिनेमावर नव्हे तर कुठे बघता येईल वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका 'कसोटी'? - Where to watch WI vs SA Test - WHERE TO WATCH WI VS SA TEST

WI vs SA 2nd Test : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. जाणून घ्या तुम्ही हा सामना भारतात कधी आणि कुठं थेट पाहू शकता. (west indies vs south africa)

where to watch south africa
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका (AFP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 15, 2024, 7:37 PM IST

गयाना WI vs SA 2nd Test : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आणि सामना अनिर्णित राहिला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमानं शानदार खेळी केली. त्यानं 182 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं सर्वाधिक 86 धावा केल्या. मात्र, दुसऱ्या डावात 15 धावा करुन तो नाबाद राहिला. तर, वेस्ट इंडिजच्या कर्णधाराच्या कामगिरीबद्दल बोलायचे झालं तर, क्रेग ब्रॅथवेटची बॅट शांत होती. त्यानं पहिल्या डावात 131 चेंडूंचा सामना केला आणि 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 35 धावा केल्यानंतर तो बाद झाला. त्याचवेळी त्याला दुसऱ्या डावात खातंही उघडता आलं नाही. तसंच वेस्ट इंडिजच्या अलिक अथनाजेनं स्फोटक खेळी खेळली. मात्र, तो त्याच्या शतकापासून फक्त 8 धावांनी दूर होता. (south africa vs west indies)

आता दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ही कसोटी जिंकून मालिका जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. (where to watch south africa national cricket team vs west indies cricket team)

  • वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल?

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून (15 ऑगस्ट 2024) खेळवला जात आहे.

  • वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठं खेळवला जाईल?

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे.

  • वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना किती वाजता खेळला जाईल?

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु झाला आहे.

  • वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना तुम्ही टीव्हीवर कुठं पाहू शकता?

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना टीव्हीवर थेट प्रक्षेपित होणार नाही.

  • वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग कुठं पहायचं?

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲपवर पाहता येईल.

हेही वाचा :

  1. आयपीएल 2025 मध्ये 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम राहणार का? जय शाहांनी केला मोठा खुलासा - Jay Shah on IPL
  2. स्वातंत्र्यदिनी सुरु होणार 2 मोठ्या क्रिकेट स्पर्धा; भारतीय संघाचे 'हे' दिग्गज खेळणार, राहुल द्रविडचा मुलगाही उतरणार मैदानात - Maharaja Trophy

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.