ETV Bharat / sports

कुलदीप की अक्षर...? दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात 'ग्रीन पार्क'वर कोणाला मिळणार संधी, समोर आली मोठी अपडेट - IND vs BAN 2nd Test Playing 11

IND vs BAN 2nd Test Playing 11 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

IND vs BAN 2nd Test Playing 11
IND vs BAN 2nd Test Playing 11 (ANI Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 26, 2024, 12:14 PM IST

कानपूर IND vs BAN 2nd Test Playing 11 : बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता दुसरा आणि शेवटचा सामना जिंकण्याच्या निर्धारानं मैदानात उतरणार आहे. दुसऱ्या कसोटीला फारसा वेळ शिल्लक नसल्यानं पहिल्या सामन्यात भारतानं बांगलादेशला पराभूत करताच बीसीसीआयने संघाची घोषणाही केली होती. मात्र संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे संघ तोच ​​आहे जो पहिल्या कसोटीसाठी निवडला गेला होता. मात्र आता दुसऱ्या कसोटीत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होणार का, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

पहिल्या कसोटीत कशी होती प्लेइंग इलेव्हन : भारतीय संघातील सर्फराज खान, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि यश दयाल भारत विरुद्ध बांगलादेश चेन्नई कसोटीला बाहेर बसले होते. आता दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होणार आहे. कुलदीप यादवचं हे होम ग्राउंड आहे, तो कानपूरचा रहिवासी आहे, त्यामुळं तो तिथं खेळताना दिसण्याची शक्यता आहे. परिणामी आकाश दीपला दुसऱ्या कसोटीत बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यापैकी एका गोलंदाजाला संधी दिली जाऊ शकते. आकाश दीपनं चांगली गोलंदाजी करत विकेट्सही घेतल्या असल्या तरी सलग दुसऱ्या सामन्यात तो खेळणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सर्फराज आणि ध्रुवला अजूनही बसावं लागेल बाहेर : पहिल्या कसोटीत सरफराज खानही बाहेर बसला होता आणि केएल राहुलला संधी देण्यात आली होती. राहुल फारसा प्रभाव पाडू शकला नसला तरी कर्णधार रोहित शर्मानं आजवर केएल राहुलवर जो विश्वास दाखवला आहे, त्यामुळं तो बाहेर पडेल असं वाटत नाही. अशा परिस्थितीत सरफराज खानची एंट्री फारच अवघड दिसत आहे. ऋषभ पंतच्या शानदार शतकानंतर ध्रुव जुरेलसाठीही दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. म्हणजेच त्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हणजेच एकंदरीत बघितलं तर संघात एकच बदल होण्याची शक्यता आहे, बाकीचा संघ पहिल्या सामन्यापासून जवळपास सारखाच खेळताना दिसेल.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप/अक्षर पटेल/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

हेही वाचा :

  1. अफगाणिस्तान-न्यूझीलंड सामन्याप्रमाणे वाहून जाणार भारत-बांगलादेश दुसरी कसोटी? कसं असेल कानपूरचं हवामान, वाचा सर्व अपडेट - Weather Forecast IND vs BAN
  2. सांघिक की वयक्तिक खेळ... कोणते खेळ आहेत शरीर आणि आरोग्यासाठी फायदेशीर? - Solo Sports vs Team Sports

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.