Virat Kohli Player of Year 2023 : टी-20 विश्वचषकाचा बिगुल वाजलाय. टीम इंडिया 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. पण, याआधी आयसीसीनं स्टार भारतीय फलंदाज विराट कोहलीला एका महत्त्वाच्या पुरस्कारानं सन्मानित केलंय. कोहलीला 'एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द इयर 2023' चा पुरस्कार जाहीर झालाय. आयसीसीनं रविवारी अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पुरस्कारासोबत कॅप दिल्याचा व्हिडीओ पोस्ट केलाय.
2023 मध्ये अप्रतिम कामगिरी : जागतिक क्रिकेटवर राज्य करणाऱ्या विराट कोहलीनं 2023 मध्ये अप्रतिम कामगिरी केलीय. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये 2023 या वर्षात सर्वाधिक धावा करणारा विराट हा दुसरा फलंदाज होता. त्यानं 72.47 च्या सरासरीनं 1377 धावा केल्या. यामध्ये त्यानं 6 शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली आहेत. या काळात त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 166 धावा आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातही कोहलीनं अप्रतिम फॉर्म दाखवला होता.
सचिनचा शतकांचा विक्रम मोडला : गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात विराट कोहलीनं चांगली कामगिरी करत 11 सामन्यात 765 धावा केल्या होत्या. विराटनं 3 शतकं करून शतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांना मागं टाकलं.
या खेळाडूंनाही पुरस्कार जाहीर : याआधी 7 भारतीय खेळाडूंना आयसीसी ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलाय. रवींद्र जडेजाला या वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघाची कॅप देण्यात आली. सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंग यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट टी-20 क्रिकेट संघाची कॅप देण्यात आलीय. तर सूर्याला देखील वर्षातील सर्वोत्तम टी-20 खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय रोहित शर्मा, मोहम्मद सिराज, शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांना आयसीसी एकदिवसीय टीम ऑफ द इयरची कॅप देण्यात आलीय.
हेही वाचा
- पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेचा ऐतिहासिक विजय; ॲरॉन जोन्सची तुफानी खेळी - T20 World Cup 2024
- टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचा प्रवास; पाकचा पराभव करत जिंकला होता पहिला कप - T20 World cup
- टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे 5 फलंदाज; पहिल्या क्रमांकावर 'हा' खेळाडू - T20 World Cup 2024
- भारत आणि पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट; 'या' दहशतवादी संघटनेनं दिली हल्ल्याची धमकी - India Pakistan Cricket match