नवी दिल्ली Vinesh Phogat Paris Olympics Wrestling : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचल्यानंतर भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट आज म्हणजेच शनिवारी सकाळी 10:30 वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचली, जिथं तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी, विनेशचे सहकारी बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक हे देखील तिथं उपस्थित होते. त्यांनी विनेशचं भारतात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यासोबतच इतर लोकांनी विनेशचे वाद्य वाजवून आणि फुलांचा हार घालून स्वागत केलं.
#WATCH | Indian wrestler Vinesh Phogat breaks down as she arrives at Delhi's IGI Airport from Paris after participating in the #Olympics2024Paris. pic.twitter.com/ec73PQn7jG
— ANI (@ANI) August 17, 2024
दिल्ली विमानतळावर विनेशचं भव्य स्वागत : विनेशची मैत्रिण साक्षी मलिक आणि तिचा नातेवाईक तसंच जवळचा मित्र बजरंग पुनिया विमानतळाबाहेर विनेशची वाट पाहत होते. त्यांना भेटताच विनेश रडू लागली, तिला रडताना पाहून तिचे चाहतेही भावूक झाले. विमानतळाबाहेर विनेशचे हजारो चाहते दिसले. विनेश भारतात आल्यावर तिच्या चाहत्यांनी ढोल वाजवून तिचं स्वागत केलं. त्यांच्या स्वागतासाठी मोठा जनसमुदाय दिसत होता आणि सर्वत्र लोक त्यांच्यासाठी आनंदोत्सव साजरा करताना दिसत होते.
VIDEO | Wrestler Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) arrives at Delhi IGI airport to a rousing welcome.
— Press Trust of India (@PTI_News) August 17, 2024
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/j93B0rE4EM
विनेशनं संपूर्ण देशाचे मानले आभार : कारमधील प्रचंड गर्दीत विनेशची रॅलीत काढण्यात आली. यावेळी तिच्यासोबत बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक देखील उपस्थित होते. विनेश मीडियाशी बोलताना म्हणाली, संपूर्ण देशाचे आभार. बजरंगनंही देशाचे आभार मानले, तर साक्षी म्हणाली, 'विनेशनं देशासाठी जे केलं ते फार कमी लोक करतात, तुम्ही विनेशला दिलेला आदर आणि प्रेम चांगलं असावं अशी माझी इच्छा आहे. तिला जास्तीत जास्त आदर आणि सन्मान द्या.'
#WATCH | Indian wrestler Vinesh Phogat receives a grand welcome at Delhi's IGI Airport
— ANI (@ANI) August 17, 2024
She arrived here from Paris after participating in the #Olympics2024Paris. pic.twitter.com/9GqbZkks7D
अंतिम सामन्यापूर्वी झाली होती अपात्र : विनेश फोगटनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यासह तिनं इतिहास रचला आणि कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. पण अंतिम सामन्याच्या दिवशी सकाळी विनेशचं वजन जास्त असल्याचं आढळून आल्यानं तिला अपात्र घोषित करण्यात आलं होतं.
हेही वाचा :