ETV Bharat / sports

भारत आणि पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट; 'या' दहशतवादी संघटनेनं दिली हल्ल्याची धमकी - India Pakistan Cricket match

India Pakistan Cricket match : भारत आणि पाकिस्तान यांच्यात न्यूयॉर्कमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. इसीसनं या सामन्यावर हल्ल्याची धमकी दिली आहे.

India Pakistan Cricket match
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 2:28 PM IST

नवी दिल्ली India Pakistan Cricket match : भारत आणि पाकिस्तान या दोन बलाढ्य संघात पुढील महिन्यात विश्वचषकाचा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट गडद झालं आहे. इस्लामिक स्टेटनं भारत पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या सामन्यावरुन धमकी दिली आहे. त्यामुळे इथली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी सांगितलं की त्यांनी "कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा वाढविण्याचे निर्देश NYPD ला दिले आहेत."

कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास समर्थ : आगामी भारत आणि पाकिस्तानमध्ये विश्वचषकाचा सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्याच्या विरोधात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची धमकी दिली आहे. याबाबत बोलताना न्यूयॉर्क शहर नासाऊ काउंटीचे प्रमुख ब्रूस ब्लेकमन म्हणाले, "आम्ही प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत. आम्ही सुरक्षेची सर्व खबरदारी घेत आहोत. आम्ही देण्यात आलेल्या धमकीला गांभीर्यानं घेत आहोत. धोक्याची शक्यता ओळखून आम्ही उपाययोजना करत आहोत. आम्ही धोक्यांना कधीही कमी लेखत नाही."

इसिसनं दिली भारत पाक सामन्यावर हल्ल्याची धमकी : इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना देशभरात इसीस ISIS म्हणून ओळखली जाते. इसीसनं एका ब्रिटिश चॅट साइटवर क्रिकेट स्टेडियमचे छायाचित्र पोस्ट केलं आहे. त्यावर ड्रोन उडत असल्याचं दिसत आहे. या छायाचित्रात भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख 9/06/2024 लिहिलेली आहे. एका वृत्तवाहिनीच्या बातमीत पोस्टचा स्क्रीनशॉट प्रसारित करण्यात आला. मात्र न्यूयॉर्कच्या अधिकाऱ्यांनी इसीसच्या पोस्टकडं फारसं लक्ष दिले नाही. मात्र, ते परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही सुरक्षा व्यवस्था वाढवत आहोत. कोणत्याही परिस्थितीला हाताळण्यात आम्ही सक्षम आहोत. सार्वजनिक सुरक्षेचा कोणताही धोका नसला तरी, आम्ही परिस्थितीचं बारकाईनं निरीक्षण करत राहू," असं हॉचुल यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. Pune ISIS Module Case : इसीस प्रकरणी एनआयएची मोठी कारवाई; कोंढवा येथील प्रॉपर्टीज जप्त
  2. इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेची झाडाझडती, छत्रपती संभाजीनगरातून ग्राफिक डिझायनरला अटक
  3. Pune ISIS Terror Module Case : पुणे इसीस मोड्युल प्रकरण ; साताऱ्यात दहशतवाद्यांकडून लूट, घेतलं बॉम्ब बनवण्याचं सामान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.