कोलंबो Team Owner Arrested in Match Fixing : क्रिकेटमधील मॅच फिक्सिंग काही संपता संपत नाही. क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा फिक्सिंगचं प्रकरण समोर आलं आहे. ताजं प्रकरण प्रसिद्ध T10 लीगशी संबंधित आहे ज्यामध्ये फ्रेंचायझीच्या भारतीय मालकाला अटक करण्यात आली आहे. भारताचा शेजारी देश श्रीलंकेत ही बाब समोर आली आहे. श्रीलंकेच्या T10 लीग 'लंका T10 सुपर लीग'च्या एका संघावर मॅच फिक्सिंगचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी 'लंका टी 10 सुपर लीग'मधील टीम गॅले मार्व्हल्सचा भारतीय मालक प्रेम ठाकूर याला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे.
Cricket in Shambles:
— Encrypted Layman 🍁 (@FreddieFaizaan) December 13, 2024
Owner of Lanka T10 Galle Marvels team Prem Thakur arrested. 🇮🇳 born owner approached a foreign player of his team for match fixing.
Currently 4 Pakistani Players Amir, Imad, Asif Ali & Umar Akmal are playing in Lanka T10 League.#LankaT10 #SAVPAK pic.twitter.com/VuPonWzk4j
भारतीय नागरिकाला अटक : ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, ठाकूरला टूर्नामेंट सुरु झाल्यावर एका दिवसानंतर गुरुवारी अटक करुन स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. या अहवालात म्हटलं की ठाकूर या भारतीय नागरिकाला श्रीलंकेच्या 'स्पोर्ट्स पोलिस युनिट'नं 2019 च्या क्रीडा-संबंधित गुन्हे प्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली आहे. कँडी येथील एका हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली. या शहरात लंका T10 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.0
Breaking : Lanka T10 team owner arrested over fixing approach
— Lahiru Mudalige (@LMudalige) December 12, 2024
An owner of a franchise in the Lanka T10 League has been arrested by Sri Lanka’s Sports Police Unit following allegations of a fixing approach, according to reports from Lankadeepa.
The arrest was made after a foreign… pic.twitter.com/IqQlobxDNg
स्पर्धा नियमित सुरु राहणार : प्राप्त वृत्तानुसार, एका परदेशी खेळाडूनं ठाकूरला फिक्सिंगच्या प्रयत्नाबद्दल सांगितलं. या वर्षाच्या सुरुवातीच्या LPL प्रमाणे, ICC लाचलुचपत प्रतिबंधक युनिटचा एक प्रतिनिधी देखील श्रीलंका क्रिकेटच्या विनंतीनुसार स्पर्धेच्या देखरेखीसाठी देशात आहे. त्यानुसार लंका T10 टूर्नामेंट संचालक समंथा दोडनवेला यांनी पुष्टी केली आहे की स्पर्धा 'शेड्यूलनुसार पुढं जाईल'.
Prem Thakkur, the team owner of Galle Marvels in Lanka T10, has been arrested on match-fixing charges 👇https://t.co/u7qpTPcFwL
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 13, 2024
लीगमध्ये दुसऱ्यांदा संघ मालकाला अटक : या वर्षातील श्रीलंकेतील ही दुसरी फ्रँचायझी स्पर्धा आहे ज्यात देशाच्या क्रीडा भ्रष्टाचारविरोधी अध्यादेशांतर्गत संघ मालकाला अटक करण्यात आली आहे. LPL फ्रँचायझी डंबुला थंडर्सचा सह-मालक तमीम रहमान याला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली मे महिन्यात अटक करण्यात आली होती. अलीकडेच 8 वर्षे जुन्या मॅच फिक्सिंग प्रकरणात 3 दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही अटक करण्यात आली होती. या तीन खेळाडूंवर 2015-16 मध्ये T20 रामस्लॅम चॅलेंज स्पर्धेत मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
हेही वाचा :