मुंबई Rishabh Pant in Auction : BCCI नं नुकतंच IPL 2025 च्या मेगा लिलावासाठी नियम जारी केले होते. यात BCCI नं अनेक नियमांमध्ये बदल करुन संघांची पर्सही वाढवली होती. नवीन नियम आले असून, अद्याप कोणत्याही संघानं त्यांची रिटेंशन यादी जाहीर केलेली नाही. अनेक स्टार खेळाडूंनी जुना संघ सोडल्याचीही चर्चा आहे. त्यामुळं यावेळी लिलाव मोठ्या प्रमाणात होणार असल्याचं मानलं जात आहे. ऋषभ पंत दिल्ली संघ सोडू शकतो अशीही अफवा आहे. चेन्नई सुपर किंग्जपासून ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुपर्यंत प्रत्येक संघाची त्याचं नाव जोडलं गेलं आहे. या बातम्यांदरम्यान पंतनं त्याच्या चाहत्यांना लिलावात जाण्याबाबत प्रश्न विचारुन खळबळ उडवून दिली आहे.
If go to the auction. will I be sold or not and for how much ??
— Rishabh Pant (@RishabhPant17) October 11, 2024
पंत दिल्ली कॅपिटल्स सोडणार? : ऋषभ पंत 2016 पासून दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. कार अपघातानंतर परतताना, त्याच्या नेतृत्वाखाली संघानं चमकदार कामगिरी केली. मात्र, तो प्लेऑफपासून केवळ एक पाऊल दूर राहिला. दिल्लीनं बेंगळुरु आणि चेन्नई संघाइतकेच सामने जिंकले होते, परंतु निव्वळ धावगतीनं ते मागे रहिले होते. अशा परिस्थितीत, त्यांची प्रतिभा आणि कामगिरी लक्षात घेऊन कोणतीही फ्रँचायझी त्याला आपल्या संघात समाविष्ट करु इच्छिते. दरम्यान, पंत यानं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यानं 11 ऑक्टोबरच्या मध्यरात्री सोशल मीडियावर चाहत्यांना प्रश्न विचारला. त्यानं विचारले, 'मेगा ऑक्शनला गेलो, तर विकला जाईल की नाही? त्याची विक्री झाली तर किती बोली लावणार?', या त्याच्या प्रश्नानं दिल्लीच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पंतच्या या प्रश्नाला अनेक चाहत्यांनी उत्तर दिलं. काहींनी 20 कोटी, काहींनी 18 कोटी, तर काही चाहत्यांनी 12 कोटींहून अधिक मिळण्याची आशा व्यक्त केली. काही चाहते होते ज्यांनी ते विनोद म्हणून घेतलं. गेल्या वेळी दिल्ली फ्रँचायझीनं ऋषभ पंतला 16 कोटींमध्ये रिटेन केलं होतं.
रिटेंशन नियमांबाबत संभ्रम : या वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. त्यात अनेक स्टार खेळाडू पाहायला मिळतात. त्यामुळं चाहत्यांमध्ये त्याची प्रचंड उत्सुकता आहे. त्यांना आशा असेल की त्यांचा आवडता संघ या स्टार खेळाडूंना विकत घेईल आणि त्यांचा संघात समावेश करेल. तथापि, त्याआधी संघांना 30 ऑक्टोंबरपर्यंत कायम ठेवण्याची यादी जाहीर करायची आहे आणि आतापर्यंत कोणत्याही फ्रेंचायझीनं तसं केलेलं नाही.
हेही वाचा :