पॅरिस Paris Olympics 2024 Table Tennis : भारताची टेबल टेनिस स्टार श्रीजा अकुलानं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये टेबल टेनिस महिलांच्या एकेरीत सिंगापूरच्या झेंग जियानवर 4-2 असा दणदणीत विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. यासह अकुलानं आपल्याच खेळाडूच्या विक्रमी कामगिरीची बरोबरी केली आहे. टेबल टेनिसच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होची. आता श्रीजा अकुलानंही राऊंड ऑफ 16 म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करुन ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसच्या प्री-कार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारी भारताची दुसरी महिला खेळाडू ठरली आहे. विशेष म्हणजे आज श्रीजाचा वाढदिवसही आहे.
Sreeja Akula becomes the 2nd Indian🇮🇳 player ever after Manika Batra to make it to the round of 1⃣6️⃣ with a victory over Singapore’s🇸🇬 Zeng Jian.
— SAI Media (@Media_SAI) July 31, 2024
She will next face World Rank 1 China’s🇨🇳 Sun Yingsha in the round of 16 with a 9-11 12-10 11-4 11-5 10-12 12-10 victory.
Super… pic.twitter.com/xpGTS72ghK
कसा झाला सामना : या सामन्याचा पहिला सेट सिंगापुरच्या जियाननं जिंकला, त्यानंतर श्रीजानं दुसरा (12-10), तिसरा (11-4) आणि चौथा सेट (11-5) जिंकला. तर पाचव्या सेटमध्ये जियाननं पुन्हा पलटवार करत सेट 10-12 असा जिंकला. यानंतर अकुलानं जोरदार पुनरागमन करत सहावा सेट 12-10 असा जिंकून सामना 4-2 असा जिंकला. यासह, तिनं राऊंड ऑफ 32 मध्ये चमकदार कामगिरी करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
सामन्यात केलं दमदार पुनरागमन : या सामन्यात श्रीजा अकुला हिलाही तिची प्रतिस्पर्धी झेंग जियानचं कडवं आव्हान पेलावं लागलं. पहिल्या सेटमध्ये ती खूप मागं पडली होती. पण तिनं पुनरागमन केलं मात्र यानंतरही तिला पहिला सेट जिंकता आला नाही. त्यानंतर तिनं शानदार पुनरागमन करत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. आता ती उपउपांत्यपूर्व फेरीत आपला सर्वोत्तम खेळ दाखवणार आहे.
मनिका बत्रानं रचला होता इतिहास : यापुर्वी भारताची स्टार पॅडलर मनिका बत्रा ही टेबल टेनिसमधील राऊंड ऑफ 16 साठी पात्र ठरणारी ऑलिम्पिक इतिहासातील पहिली भारतीय महिला टेबल टेनिस खेळाडू ठरली. बत्रानं 31 जुलै रोजी झालेल्या टेबल टेनिस महिला एकेरीच्या राऊंड ऑफ 32 फेरीच्या सामन्यात फ्रेंच खेळाडू प्रितिका पावडेचा 4-0 असा पराभव केला.
हेही वाचा :