ETV Bharat / sports

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशानं जिंकलं पहिलं सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक? - Paris Olympics 2024

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Jul 27, 2024, 7:45 PM IST

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या सुरुवातीनंतर शनिवार 27 जुलै रोजी पहिल्या दिवशी कोणत्या देशांनी पहिलं सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकलं? जाणून घ्या सविस्तर...

Paris Olympics 2024
पॅरिस ऑलिम्पिक (AP Photo)

पॅरिस (फ्रान्स) Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला 27 जुलैपासून सुरुवात झाली. भारताला 10 मीटर एअर रायफल मिश्र संघाकडून पहिल्या दिवशी पदकाची अपेक्षा होती. मात्र ते भारताला पदक मिळवून देऊ शकलं नाही. तथापि, भारताची अव्वल नेमबाज मनू भाकरनं चमकदार कामगिरी करत 10 मीटर एअर पिस्तूल महिलांच्या वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली ही भारतासाठी आनंदाची बाब होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशानं पहिलं पदक जिंकलं ते जाणून घ्या.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कझाकिस्ताननं जिंकलं पहिलं पदक : कझाकस्ताननं 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या रुपात पहिलं पदक जिंकलं. 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत कझाकिस्ताननं जर्मनीचा 17-5 असा पराभव करत कांस्यपदक जिंकलं.

चीननं जिंकलं पहिलं सुवर्णपदक : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिलं सुवर्णपदक चीननं पटकावलं. चीनच्या मिश्रित नेमबाजी जोडी हुआंग युटिंग आणि शेंग लिहाओ यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या किम जिह्योन आणि पार्क हाजून या जोडीचा 16-12 असा पराभव करत शानदार सुरुवात केली.

दक्षिण कोरियाला पहिलं रौप्यपदक : दक्षिण कोरियानं पॅरिस ऑलिम्पिक 2024 चं पहिले रौप्यपदक जिंकलं आहे. कोरियाच्या 10 मीटर एअर रायफल मिश्र संघानं अंतिम फेरीत दुसरं स्थान मिळवून कोरियाला रौप्य पदकाच्या रुपात पॅरिसचं पहिलं पदक मिळवून दिलं.

भारताच्या नेमबाजांकडून निराशा : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिल्या दिवशी भारतीय नेमबाजांकडून पदकांची अपेक्षा होती, पण त्यांनी निराशा केली. 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत दोन्ही भारतीय जोडी अंतिम फेरीसाठी पात्र ठरु शकल्या नाहीत. इलावेनिल वालारिवन आणि संदीप सिंग 12 व्या स्थानावर राहिले तर रमिता जिंदाल आणि अर्जुन बबुता यांनी सहावा क्रमांक पटकावला. रमिता-अर्जुननं एकूण 628.7 गुण मिळवले. तर इलावेनिल-संदीप यांना 626.3 गुण मिळाले.

हेही वाचा :

  1. पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी नेमबाजांनी चुकवला 'निशाणा'; सरबजोत सिंगला अंतिम फेरीची थोडक्यात हुलकावणी - Paris Olympics 2024
  2. मनू भाकरचा नेमबाजीत अचूक 'निशाणा'; 10 मीटर एअर पिस्तूल महिलांच्या अंतिम फेरीत प्रवेश, देशाला मिळणार पहिलं पदक? - Paris Olympics 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.