ETV Bharat / sports

"ऑलिम्पिकमध्ये मेहनत करत नसाल तर..", दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण बॅडमिंटनपटूंच्या खराब कामगिरीवर संतापले - Paris Olympics 2024

Prakash Padukone : प्रपॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये बॅडमिंटनमध्ये भारताच्या पदरी निराशा आली आहे. लक्ष्य सेनकडून भारताला पदकाची अपेक्षा होती. पराभवाचा सामना करावा लागला. प्रकाश पदुकोण पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर खूश नाहीत. त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Prakash Padukone
प्रकाश पदुकोण (Source - Getty Image)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 6, 2024, 2:47 PM IST

नई दिल्ली Prakash Padukone : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे 117 खेळाडू सहभागी झाले आहेत. 10 दिवसांनंतरही भारताच्या खात्यात फक्त तीन कांस्यपदकं आहेत, जी नेमबाजीत आली आहेत. भारताला सोमवारी 22 वर्षीय बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेनकडून पदकाची अपेक्षा होती, पण त्यालाही पराभवाचा सामना करावा लागला. कांस्यपदकाच्या लढतीत त्याला मलेशियाच्या ली जी जियाविरुद्ध 1-13, 16-21, 11-21 असा पराभव पत्करावा लागला. गेल्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणाऱ्या पी. व्ही. सिधूंलाही यावेळी चांगली कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी पॅरिसमधील खराब कामगिरीनंतर भारतीय बॅडमिंटनपटूंवर नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले प्रकाश पदुकोण? : लक्ष सेन कांस्यपदकाच्या लढतीत पराभूत झाल्यानंतर प्रकाश पादुकोण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "आता खेळाडूंनी जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे. सध्याचे ऑलिम्पिक आणि मागील ऑलिम्पिक पाहिल्यास आपण सरकार आणि फेडरेशनला जबाबदार धरू शकत नाही. कारण फेडरेशनने आणि सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडली आहे. जे काही तुमच्या गरजेचं होतं ते त्यांनी तुम्हाला दिलं. ते फक्त सुविधा देऊ शकतात. बाकी सर्व तुमच्या हातात आहे की, तुम्ही किती मेहनत करता आणि ते मैदानात कसं करून दाखवता. खेळाडूंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे."

आणखी किती करणार? : "तुम्ही त्या खेळाडूंना बाकीच्या इव्हेंटमध्ये पराभूत करत आहे, पण मोठ्या स्तरावर त्यांना पराभूत का करत नाही? हा प्रश्न खरं तर खेळाडूंनी स्वतःला विचारायला हवा की मी जी मेहनत घेताय ती योग्य आहे का? तेवढी मेहनत बरोबर आहे का? कारण जर तुम्ही तेवढी मेहनत पदक मिळवण्यासाठी ऑलिम्पिकमध्ये मेहनत करत नसाल तर मोठ्या स्तरावर जाणं व्यर्थ आहे. प्रत्येक खेळाडूसाठी वेगळा प्रशिक्षक, वेगळा डॉक्टर आणि बरंच काही सपोर्टिंग स्टाफ असं वेगवेगळे देण्यात आलं आहे. आणखी किती करणार? तुमच्यासाठी सरकार सर्व काही करत आहे. मला नाही वाटत की दुसरे कोणत्या देशांमध्ये अशा प्रकारच्या सुविधा दिल्या जातात." असं प्रकाश पदुकोण म्हणाले.

लक्ष्य सेन पदक जिंकू शकला असता पण... : "चौथ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंमुळे मी खूश नाहीय. लक्ष्य सेन पदक जिंकू शकला असता पण इतक्या जवळ आल्यानंतरही तो विजयापासून हुकला. भारताला बॅडमिंटनमधून तीन पदकांची अपेक्षा होती, मात्र एकही पदक जिंकण्यात भारताला यश आलं नाही." असंही प्रकाश पदुकोण म्हणाले.

2008 नंतर पहिल्यांदाच भारत ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये पदकाशिवाय परतणार आहे. तीन सेटपर्यंत चाललेल्या कांस्यपदकाच्या लढतीत लक्ष सेन हरला. त्यामुळं बॅडमिंटनमधून पदकाची आशा संपूष्टात आली. पीव्ही सिंधूला महिला एकेरीच्या 16 फेरीत चीनच्या हि बिंग जिओकडून पराभव पत्करावा लागला. तर पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह वुई यिक यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

हेही वाचा

  1. 'मराठमोळ्या' अविनाश साबळेनं पॅरिस गाजवलं; 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय - Paris Olympics 2024
  2. 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा आज फेकणार पॅरिसमध्ये 'भाला', सामान कधी आणि कुठे पाहता येणार? - Paris Olympics 2024
  3. जर्मनीला हरवून भारत पुन्हा एकदा इतिहास रचणार, माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांचं मत - PARIS OLYMPICS 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.