पॅरिस Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कॅनडाच्या महिला फुटबॉल संघाचे सहा गुणांची कपात करण्यात आली. तसंच ड्रोन हेरगिरी प्रकरणामध्ये शनिवारी त्यांच्या तीन प्रशिक्षक कर्मचाऱ्यांवर प्रत्येकी एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली. बुधवारी सलामीच्या सामन्यापूर्वी प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या सराव सत्रांची हेरगिरी करण्यासाठी कॅनडानं ड्रोनचा वापर करुन त्याला पकडण्यात आल्याची माहिती आहे.
कारवाईमुळं सामन्यांवर परिणाम होणार : कॅनडियन सॉकर असोसिएशन (CSA) आणि तिचे अधिकारी बेव्हरली प्रिस्टमन, जोसेफ लोंबार्डी आणि जास्मिन मँडर यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरु केल्यानंतर, फिफा शिस्तपालन समितीच्या अध्यक्षांनी हे प्रकरण थेट फिफाकडे कलम 56.3 नुसार पाठवल्याचं फिफानं म्हटलं आहे. या कार्यवाहीच्या निकालामुळं चालू असलेल्या महिला ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यांवर परिणाम होईल. या शक्यतेमुळं XXXIII पॅरिस ऑलिम्पिक अंतिम स्पर्धा आणि प्रतिसादकर्त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला. फिफानं कॅनेडियन सॉकर असोसिएशन (CSA) ला फिफा अनुशासनात्मक संहितेच्या कलम 13 आणि XXXIII पॅरिस ऑलिम्पिक फायनल कॉम्पिटिशन (OFT) च्या कलम 6.1 चं उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा दिली.
सहा गुणांची कपात : ऑलिम्पिक फायनल कॉम्पिटिशनच्या गट अ मधील कॅनेडियन सॉकर असोसिएशनच्या महिला प्रतिनिधी संघाची सहा गुणांची कपात आणि CHF 200,000 चा दंड आणि बेव्हरली प्रिस्टमन, जोसेफ लोंबार्डी आणि जास्मिन मँडर यांना प्रत्येकी एका वर्षासाठी प्रतिबंधित केलं.
पहिल्या सामन्यात कॅनडाचा विजय : कथित ड्रोन हेरगिरी करुन कॅनडानं त्यांचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध 2-1 असा जिंकला, म्हणजे ते आता -3 गुणांवर आहेत आणि अ गटात शेवटच्या स्थानावर आहेत. गुणांची कपात करुनही, कॅनडाला पात्रतेची संधी आहे. सोमवारी त्यांच्या दुसऱ्या सामन्यात फ्रान्सशी सामना होईल.
हेही वाचा :
- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज पीव्ही सिंधूसह 'हे' दिग्गज खेळाडू दाखवणार प्रतिभा - Paris Olympics 2024
- ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघाची दमदार सुरुवात, न्यूझीलंडचा केला पराभव; 'या' खेळाडूंनी केले गोल - Paris Olympics 2024
- बॅडमिंटनमध्ये भारताचा डबल धमाका; सात्विक-चिरागची विजयी सुरुवात, यजमानांचा सरळ सेटमध्ये पराभव - Paris Olympics 2024