पॅरिस Paris Olympics 2024 Skeet : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग स्कीट मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्यापासून थोडक्यात हुकले. अनंतजीत-माहेश्वरी यांचा चीनच्या जियांग यितिंग आणि लिऊ जियानलिन यांनी 44-43 असा पराभव केला.
भारतीय जोडीची कांस्यपदक जिंकण्याची संधी हुकली : या सामन्यात चीनच्या जोडीनं पहिल्या फेरीत सर्व 8 शॉट्स मारले, तर भारतीय जोडीला 8 पैकी 7 शॉट्स मारता आले. दुसऱ्या फेरीत चीननं 8 पैकी 5 शॉट्स मारले आणि 3 शॉट चुकलं. त्यामुळं भारतीय जोडीनं 8 पैकी 6 शॉट्स मारले आणि त्यांचे 2 शॉट हुकले. तिसऱ्या फेरीत चिनी जोडीनं 8 पैकी 7 शॉट्स मारले तर भारतीय जोडीला 8 पैकी 7 शॉट मारता आले. यावेळी 20-20 अशी बरोबरी होती.
रंगतदार सामना : या सामन्याच्या चौथ्या फेरीत भारतीय जोडीनं 8 पैकी 7 शॉट्स तर चिनी जोडीनं 8 पैकी 8 शॉट्स मारले. चीनी आणि भारतीय जोडीनं पाचव्या फेरीत त्यांच्या 8 पैकी 8 शॉट्स मारले आणि स्कोअर 36-35 असा केला. यानंतर कांस्यपदकाचा निकाल अंतिम म्हणजेच सहाव्या फेरीत पोहोचला. या शेवटच्या फेरीत भारतीय जोडीनं 8 पैकी 8 शॉट्स मारले आणि गुणसंख्या 43 वर नेली. यानंतर चीनच्या जोडीनं 8 पैकी 8 फटके मारत स्कोअर 44-43 असा केला आणि सामना जिंकला. यासह भारताच्या कांस्यपदक जिंकण्याच्या आशा संपल्या.
चीनशी बरोबरी साधत पदकाच्या लढतीत निर्माण केलं स्थान : स्कीट मिश्र सांघिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारतीय जोडीनं 146 गुणांसह चिनी जोडीशी बरोबरी साधली, तर चीन तिसऱ्या आणि भारत चौथ्या क्रमांकावर राहिला, यामुळं या दोन्ही संघांना कांस्यपदकासाठी सामना खेळावा लागला. पण पदकाच्या सामन्यात भारताचा पराभव झाला. पराभवाला सामोरं जावं लागलं, यासोबतच आणखी एक पदक जिंकण्याची भारतीय चाहत्यांची आशा मावळली.
हेही वाचा :