paris olympic 2024 : शुक्रवारपासून पॅरिस ऑलिम्पिक 2024चा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत 206 देशातील 10,500 खेळाडू सहभागी होणार आहेत. ऑलिम्पिक ही जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या इतिहासात असे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांनी आपल्या जादूनं या स्पर्धेची मजा वाढवली. या महान खेळाडूंनी इतके मोठे विश्वविक्रम केले, जे आजही मोडण्याचं स्वप्न पाहिलं जातं. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये किती नवीन विक्रम होणार, याकडे तमाम क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे. चला एक नजर टाकूया ऑलिम्पिकच्या इतिहासातील अशा 10 विश्वविक्रमांवर जे मोडणे जवळपास अशक्य आहे.
Three years ago today, the Olympics took place in Tokyo. As you prepare for #Paris2024, relive the breathtaking pictogram performance at the Opening Ceremony. #OnThisDay #Olympics pic.twitter.com/xyWGNjxG2u
— The Olympic Games (@Olympics) July 22, 2024
ऑलिम्पिक इतिहासात 10 मोठे विश्वविक्रम
800 मीटर शर्यतीतील विक्रम : लंडन ऑलिम्पिकमध्ये (2012) केनियाचा धावपटू डेव्हिड रुदिशा यानं पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत 1 मिनीट 40.91 सेकंद वेळेसह नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला. हा विक्रम आजपर्यंत अबाधित आहे.
From Phryge to Phevos 👀
— The Olympic Games (@Olympics) July 22, 2024
We take a look back at some of the iconic Olympic mascots who have entertained sporting arenas and athletes over the last five Olympic Games.#Olympics | #Paris2024 | #LastFive pic.twitter.com/m1PkcSqfgk
400 मीटर अडथळा शर्यतीतील विक्रम : नॉर्वेचा वेगवान धावपटू कार्स्टन वारहोम यानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत 45.64 सेकंद वेळेसह जागतिक विक्रम केला. त्याची ही कामगिरी मागील 18 स्पर्धांपेक्षा सरस ठरलीय.
Olympic World presented by @Visa is live on @Roblox! Compete, explore, and celebrate the Olympic Games in a whole new way.
— The Olympic Games (@Olympics) July 20, 2024
To celebrate we are giving away free UGC once we cross 1000 likes.
Like and redeem your UGC at the link in bio!#roblox #olympics #LetsMove #Paris2024 pic.twitter.com/yKke5qOEzd
ऑलिम्पिकमध्ये मायकल फेल्प्सचा डंका : अमेरिकेचा जलतरणपटू मायकल फेल्प्स हा ऑलिम्पिकच्या इतिहासातील एक महान खेळाडू आहे. त्यानं 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिलाय. तो एका ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदकं जिंकणारा खेळाडू ठरला. या ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्णपदकं जिंकून फेल्प्सनं वर्ल्ड रेकॉर्ड केला. शिवाय ही आठ सुवर्णपदकं जिंकताना त्यानं तब्बल सात विक्रम मोडीत काढले.
बटरफ्लायमधील वर्ल्ड रेकॉर्ड : अमेरिकन जलतरणपटू पॅलेब ड्रेसेल यानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये (2020) पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय जलतरण स्पर्धेत 49.45 सेकंद वेळ नोंदवित नवा विश्वविक्रम केला. त्यानं स्वतःचाच आधीचा विक्रम 0.05 सेकंदाच्या फरकानं मोडला.
उसेन बोल्टचा जलवा : 'वेगाचा बादशहा' अशी ओळख असलेला जमैकाच्या उसेन बोल्टनं बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर शर्यतीत 9.69 सेकंद वेळेसह नवा विश्वविक्रम रचला. बोल्ट या शर्यतीत इतका पुढे गेला होता, की फिनिशिंग लाईन पार करण्यापूर्वीच त्यानं जल्लोष करण्यास सुरुवात केली होती.
8.90 मीटर विक्रमी उडी : अमेरिकेचा लांब उडीतील खेळाडू बॉब बीमॉन यानं 1968च्या मॅक्सिको ऑलिम्पिकमध्ये 8.90 मीटर (29.2 फूट) उडी मारून वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्यानं या ऑलिम्पिकमध्ये केवळ सुवर्णपदकच जिंकले नाही, तर आधीच्या विक्रमापेक्षा दोन फूट अधिक लांब उडी मारली. बीमॉनच्या या विक्रमाच्या आसपासदेखील आजपर्यंत कोणाला पोहोचता आलं नाही.
200 मीटर शर्यतीतील विक्रम : अमेरिकेच्या फ्लोरेन्स ग्रिफिथ जॉयनर हिनं 1988 मध्ये सियोल ऑलिम्पिकमध्ये 200 मीटर शर्यतीत 21.34 सेकंद वेळेसह विश्वविक्रम केलाय. तिचा हा विश्वविक्रम आजपर्यंत कोणालाही मोडता आला नाही.
रिलेत जमैका संघाचा विक्रम : 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये जमैका संघानं 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीत 36.84 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले होते. या रिले संघात उसेन बोल्टचाही समावेश होता. त्यांचा हा विक्रम आजही कायम आहे.
हेही वाचा
- कसं असतं ऑलिम्पिक गाव? कधीपासून सुरु झाली ऑलिम्पिक खेळाडूंसाठी 'ही' सुविधा - Paris Olympics 2024
- बीसीसीआयचे सचिव जय शाहांची मोठी घोषणा, पॅरिस ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना जाहीर केली मदत - Paris Olympics 2024
- ऑलिम्पिकचं आयोजन करणारा यजमान देश कमवतो की तोट्यात जातो? जाणून घ्या, सविस्तर - Paris Olympics 2024
- रोहित-विराट 2027 चा वर्ल्ड कप खेळणार? गंभीर म्हणाला "तो त्यांचा वैयक्तिक निर्णय" - Gautam Gambhir Press Conference