माउंट माउंगानुई NZ vs SL 2nd T20I Live Streaming : न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका सुरु आहे. यातील दुसरा सामना आज माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकत यजमान किवी संघानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Leading the comeback! Hear from Jacob Duffy on his Player of the Match performance in T20I 1 at Bay Oval 🏏 #NZvSL #CricketNation #Cricket pic.twitter.com/9hXnn1M4V2
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 29, 2024
पहिल्या सामन्यात काय झालं : पहिल्या T20 सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर न्यूझीलंड संघानं 20 षटकात 8 गडी गमावून 172 धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलनं सर्वाधिक 62 धावांची खेळी खेळली. या झंझावाती खेळीदरम्यान डॅरिल मिशेलनं 42 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकार ठोकले. डॅरिल मिशेलशिवाय मायकेल ब्रेसवेलनं 59 धावा केल्या. श्रीलंकेकडून बिनुरा फर्नांडो, महेश थेक्षाना आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले.
A thriller at Bay Oval! Key overs from Jacob Duffy (3-21) through the middle and composure at the death from Matt Henry (2-28) and Zak Foulkes (2-41) to snatch victory in T20I 1. Catch up on all scores | https://t.co/nLnN0S54sv 📲 #NZvSL #CricketNation pic.twitter.com/EQz8WTQJAe
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 28, 2024
श्रीलंकेनं हातातला सामना गमावला : लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात स्फोटक झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीवीरांनी अवघ्या 81 चेंडूत 121 धावांची झटपट भागीदारी केली. मात्र यानंतर त्यांचा डाव कोसळला आणि श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 164 धावा करु शकला. श्रीलंकेसाठी सलामीवीर पथुम निसांकानं सर्वाधिक 95 धावांची खेळी खेळली. न्यूझीलंडकडून जेकब डफीनं सर्वाधिक तीन बळी घेतले. जेकब डफीशिवाय मॅट हेन्री आणि झॅकरी फॉल्केसने प्रत्येकी दोन बळी घेतले.
A New Zealand T20I record sixth-wicket partnership between Michael Bracewell (59) and Daryl Mitchell (62) driving the batting innings at Bay Oval! Follow play LIVE in NZ with TVNZ 1, TVNZ+, Sport Nation and The ACC. LIVE scoring | https://t.co/rG8z0rpkrn 📲 #NZvSL #CricketNation pic.twitter.com/17RYwHAR2w
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 28, 2024
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : 2006 साली श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 26 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत न्यूझीलंड संघानं 15 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेचा संघ फक्त आठ सामने जिंकू शकला आहे. त्याच वेळी, 2 सामने टाय झाले आहेत आणि 1 सामन्याचा निकाल लागला नाही. न्यूझीलंडमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 9 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत न्यूझीलंड संघानं सात सामने जिंकले असून एक सामना गमावला आहे. त्याच वेळी, 1 सामना बरोबरीत आहे.
A meeting of the skippers at Pilot Bay in Mount Maunganui 📍
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 26, 2024
The KFC T20I series gets underway tomorrow night at Bay Oval. Follow play LIVE in NZ with TVNZ 1, TVNZ+, Sport Nation and The ACC. Buy tickets | https://t.co/6yy8Hlooyz 🎟️ #NZvSL #CricketNation pic.twitter.com/huyxMDxXUt
वेगवान गोलंदाजी ताकद : मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा संघ आत्मविश्वासानं भरलेला दिसत आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा आणि वेगवान गोलंदाजी ही संघाची ताकद आहे. न्यूझीलंड संघाचे फलंदाज टिम रॉबिन्सन आणि मार्क चॅपमन सुरुवातीला वेगवान गतीनं धावा करण्याचा प्रयत्न करतील, तर मधल्या फळीत रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिशेल यांच्यावर धावांची जबाबदारी असेल. गोलंदाजीत जेकब डफी आणि मॅट हेन्री वेगवान सुरुवात करतील, तर सँटनर आणि झॅकरी फॉल्केस मधल्या षटकांमध्ये सामना टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतील.
श्रीलंकेच्या फलंदाजांचा संघर्ष : दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघाला न्यूझीलंडमध्ये कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर श्रीलंकेचे फलंदाज खूप संघर्ष करताना दिसले. पथुम निसांका आणि कुसल मेंडिस या सलामीच्या जोडीकडून पुन्हा वेगवान सुरुवात अपेक्षित असेल. तर कुसल परेरा, चरित असलंका आणि भानुका राजपक्षे हे मधल्या फळीत संघाला बळ देतील. गोलंदाजीमध्ये विरोधी संघाच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मातिषा पाथिराना, नुवान तुषारा आणि वानिंदू हसरंगा यांच्यावर असेल.
The T20 international summer starts tomorrow at Bay Oval! ☀️
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 26, 2024
Follow the KFC T20I series against Sri Lanka LIVE with TVNZ 1, TVNZ+, Sport Nation and The ACC. Buy tickets | https://t.co/sWICQTydD8 🎟️ #NZvSL #CricketNation #Cricket pic.twitter.com/va5DkGBjvG
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा T20 सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 30 डिसेंबर रोजी होणार आहे. उभय संघांमधला हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11:45 वाजता माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल, ज्यातील नाणेफेक अर्धा तास आधी होईल.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा T20 कुठं आणि कसा पाहावा?
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा T20 सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येईल. याशिवाय, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर पाहता येईल.
A thriller at Bay Oval! Key overs from Jacob Duffy (3-21) through the middle and composure at the death from Matt Henry (2-28) and Zak Foulkes (2-41) to snatch victory in T20I 1. Catch up on all scores | https://t.co/nLnN0S54sv 📲 #NZvSL #CricketNation pic.twitter.com/EQz8WTQJAe
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 28, 2024
मालिकेसाठी दोन्ही संघ :
न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मिच हे, मॅट हेन्री, बेव्हॉन जेकब्स, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन आणि नॅथन स्मिथ.
श्रीलंका : चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कामिंदू मेंडिस, दिनेश चंडिमल, भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, महिश थेक्षाना, जेफ्री वांडर्से, चमिथरामा, नुक्शाहरा, चमिथरा, नुक्शाहाना, चमिंडू असेरा. फर्नांडो, बिनुरा फर्नांडो.
हेही वाचा :