मुंबई KS Bharat Viral Video : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, कपिल देव, आर अश्विन, हरभजन सिंग यांच्यासह अनेक सेलिब्रेटींना आमंत्रित करण्यात आलंय.
-
KS Bharat dedicated his century against England Lions to Shree Ram ahead of the 'Pran Pratishtha'. pic.twitter.com/awSgaIfvP7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 21, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">KS Bharat dedicated his century against England Lions to Shree Ram ahead of the 'Pran Pratishtha'. pic.twitter.com/awSgaIfvP7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 21, 2024KS Bharat dedicated his century against England Lions to Shree Ram ahead of the 'Pran Pratishtha'. pic.twitter.com/awSgaIfvP7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 21, 2024
खास पद्धतीनं सेलिब्रेशन केलं : या दरम्यान, भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. केएस भरतनं भारत 'अ' संघाकडून खेळताना इंग्लंड लायन्सविरुद्ध शानदार शतक झळकावलं. या शतकानंतर त्यानं खास पद्धतीनं सेलिब्रेशन केलं. हा व्हिडिओ या सेलिब्रेशनचा आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : केएस भरत यानं इंग्लंड लायन्सविरुद्धचं आपलं शतक भगवान श्री रामाला समर्पित केलं. त्यानं शतक मारल्यानंतर हाताचा आकार धनुष्यबाणासारखा करत शतकाचा आनंद साजरा केला. भरतनं त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. सोशल मीडिया यूजर्स यावर सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.
केएस भरतच्या खेळीमुळे भारताचा पराभव टळला : केएस भरतच्या खेळीमुळे टीम इंडियानं इंग्लंड लायन्सविरुद्धचा पहिला अनधिकृत कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. या सामन्यात भरतनं लढाऊ शतक झळकावलं आणि भारताची लाज राखली. या यष्टीरक्षक फलंदाजानं 165 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीनं 116 धावा केल्या. त्याच्याशिवाय तिसऱ्या दिवशी नाईट वॉचमन म्हणून आलेल्या मानव सुथारनं 254 चेंडूत नाबाद 89 धावांची संस्मरणीय खेळी केली.
हे वाचलंत का :