शिर्डी Fiza Sayyed Visits Shirdi : राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघातील खेळाडू फिजा सय्यद हिनं शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं आहे. दर्शनानंतर साईबाबा संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शॉल साई मूर्ती देवून फिजा सय्यदचा सत्कार केला.
मंदिर समितीकडून फिजाचा सत्कार : राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघातील खेळाडू फिजा सय्यद हिनं शिर्डीत येत साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं आहे. यावेळी फिजानं आपल्या गळ्यातील गोल्ड मेडल काढून काही काळ साईबाबांच्या चरणी ठेवलं. तसंच पुढील वाटचालीसाठी तिनं साईंच्या चरणी प्रार्थना केली. फिजा सय्यद सोळाव्या वरिष्ठ पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. फिजा ही अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील रहिवासी असून तिनं आपल्या उल्लेखनीय खेळानं संघाच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तिच्या खेळातील उत्कृष्ट योगदानाबद्दल साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी तिचा सन्मान केला तसंच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
![Fiza Sayyed Visits Shirdi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15-02-2025/23548778_fizzaaa.jpg)
अनेक स्पर्धांमध्ये सहभाग पदकंही जिंकली : फिजा सय्यद हि आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू आहे. तालुक्यापासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत विविध स्पर्धांमध्ये यशस्वीरित्या सहभागी झाली आहे. तिनं 2018 मध्ये छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या 24व्या ज्युनियर राष्ट्रीय महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलं. तसंच आंध्र प्रदेशात आयोजित 36वी ज्युनियर राष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात महाराष्ट्र संघात मोठी भूमिका बजावली. यानंतर 2022-23 मध्ये वरिष्ठ राज्य सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. 14व्या फेडरेशन कप राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत 2023-24 मध्ये सुवर्णपदक जिंकलं. तर 44व्या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2022-23 मध्येही तिनं सुवर्णपदक जिंकलं.
![Fiza Sayyed Visits Shirdi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15-02-2025/23548778_fizxzzzzzzzz.jpg)
हेही वाचा :