ETV Bharat / sports

विराट कोहलीच्या बालेकिल्ल्यात स्मृती मंधानाचं 'राज'; सलग दुसरं शतक झळकावत रचला इतिहास - smriti mandhana

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 4:59 PM IST

Smriti Mandhana : बंगळुरुत सुरू असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात स्मृती मंधानानं शतक झळकावलंय. यासह तिनं अनेक विक्रमांना गवसणी घातलीय.

स्मृती मंधाना
स्मृती मंधाना (BCCI)

बंगळुरु Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात स्मृती मंधानानं शतक झळकावलंय. यासह तिनं मालिकेतील सलग दुसरं शतक झळकावलं. या शतकासह तिनं अनुभवी मिताली राजसह 5 खेळाडूंची बरोबरी केली. ती, मिताली राजसह, भारतीय महिला क्रिकेटपटूनं सर्वाधिक शतकं झळकावणारी खेळाडू बनलीय. तिनं आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 120 चेंडूत 136 धावांची खेळी केली. यात तिनं तब्बल 18 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.

सातवं एकदिवसीय शतक : स्मृतीचं हे सातवं एकदिवसीय शतक होतं. मिताली राजच्या नावावरही तेवढीच शतकं आहेत. महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 15 शतकांचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगच्या नावावर आहे. तिच्याशिवाय न्यूझीलंडच्या सुझी बेट्सनं 13 शतकं झळकावली आहेत. या दोन खेळाडूंशिवाय कोणीही 10 पेक्षा जास्त शतकं झळकावलेली नाहीत. स्मृती ही फक्त 27 वर्षांची आहे. अशा परिस्थितीत ती सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रमही आपल्या नावावर करू शकते.

मिताली राजसह 5 खेळाडूंची बरोबरी : स्मृती मंधाना आणि मिताली राज यांच्याशिवाय वेस्ट इंडिजची स्टॅफनी टेलर, न्यूझीलंडची एमी सॅटरथवेट, इंग्लंडची सारा टेलर आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड यांनी प्रत्येकी 7 शतकं झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाची कॅरेन रोल्टन, न्यूझीलंडची स्टेफनी डेव्हाईन आणि इंग्लंडची क्लेअर टेलर यांनी प्रत्येकी 8 शतकं झळकावली आहेत. तर इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्स, टॅमी ब्युमाउंट, नॅट सायव्हर ब्रंट आणि श्रीलंकेच्या चमारी अटापट्टू यांनी प्रत्येकी 9 शतकं झळकावली आहेत.

सलग दोन एकदिवसीय शतकं झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू : स्मृती मंधाना ही सलग दोन एकदिवसीय शतके झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. योगायोगानं, सलग एकदिवसीय शतकं झळकावणारी मंधाना ही पहिली आशियाई महिला क्रिकेटपटू आहे, तर 2016-17 मध्ये सलग चार शतकं झळकावणारी न्यूझीलंडची एमी सॅटरथवेट या यादीत आघाडीवर आहे. एकदिवसीय महिला सलामीवीरांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मंधाना सहाव्या स्थानावर आहे. तिच्या सातव्या शतकासह, मंधाना या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या सलामीवीर फलंदाजांच्या यादीत संयुक्त तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.

हेही वाचा :

  1. टी-20 विश्वचषक कोण जिंकणार ? 17 वर्षांच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यास भारत सज्ज - T20 World Cup 2024
  2. ऑस्ट्रेलियाच्या विजयानं इंग्लंडचं चमकलं नशीब, 'या' एका कारणामुळे सुपर 8 मध्ये मिळाला प्रवेश - T20 World cup 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.