नवी दिल्ली Gautam Gambhir Fight : भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर त्याच्या आक्रमक शैलीबद्दल सर्वांनाच परिचित आहे. मैदानावर तो अनेकवेळा वेगवेगळ्या खेळाडूंशी भिडला आहे. पण आता एक मोठा खुलासा समोर आला आहे की, मैदानाबाहेरही भारतीय प्रशिक्षकाची वृत्ती तीक्ष्ण राहते आणि तीही लहानपणापासून आहे. दिल्ली क्रिकेट टीम आणि भारतीय संघात गंभीरसोबत खेळणारा माजी फलंदाज आकाश चोप्रानं एक घटना सांगितली आहे. जेव्हा गंभीरनं रागाच्या भरात ट्रक ड्रायव्हरची कॉलर पकडली होती.
Aakash Chopra Said “Once, Gautam Gambhir got out of his car and climbed the truck to grab the collar of the driver because he made a wrong turn and was abusing” (Raj Shamani Podcast)#INDvsBAN pic.twitter.com/lg6O2cAulM
— ASHER.🇮🇳. (@ASHUTOSHAB10731) September 16, 2024
गौतमचा गंभीर स्वभाव : भारतीय क्रिकेटमध्ये प्रदीर्घ काळ घालवलेला गौतम गंभीर त्याच्या आक्रमक आणि रागावलेल्या वागणुकीसाठी ओळखला जातो. तो नेहमीच कोणाचाही सामना करण्यास तयार असतो. पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इतर संघांच्या खेळाडूंशी त्याचं भांडण प्रत्येकानं पाहिलं आहे. परंतु, केवळ परदेशी खेळाडूच नाही तर तो आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंशीही भिडताना दिसला आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीसोबतचे त्याचं भांडण कधीच विसरता येणार नाही.
गंभीरची ट्रकचालकाशी बाचाबाची : माजी सलामीवीर आकाश चोप्रानं सांगितलेल्या गंभीरच्या या घटनेवरुन असं दिसतं की तो देखील दिल्लीच्या सामान्य मुलांसारखा होता. जे कोणत्याही मुद्द्यावर लढण्यास तयार असतात. राज शामानी पॉडकास्टमध्ये आकाश चोप्रानं गंभीरच्या आक्रमकतेबद्दल सांगितलं आणि यादरम्यान त्याच्याशी संबंधित एक घटना सांगितली. चोप्रा म्हणाला की, गौतम गंभीर दिल्लीत अनेकवेळा सांगत असे की, त्यानं एकदा ट्रक ड्रायव्हरशी भांडण केलं होतं. चोप्रानं पुढं सांगितलं की, ट्रक ड्रायव्हरनं त्याच्या कारला ओव्हरटेक करुन शिवीगाळ केल्यामुळं गंभीरनं हे कृत्य केलं. त्यानंतर गंभीरनं कार थांबवत ट्रकवर चढला आणि ड्रायव्हरची कॉलर पकडली.
गंभीरसोबत नेहमीच स्पर्धा : चोप्रानं असंही सांगितलं की, त्यानं गंभीरला सांगितलं की त्याच्या शैलीनं तो एक खेळाडू आणि या उंचीचा व्यक्ती बनवला. इतकंच नाही तर चोप्रानं असंही सांगितलं की दिल्ली संघात स्थान मिळवण्यासाठी त्याच्या आणि गंभीरमध्ये नेहमीच स्पर्धा होती. दोघंही सलामीच्या स्थानासाठी दावा करत होते आणि अशा परिस्थितीत दोघांमध्ये नेहमीच चुरशीची स्पर्धा असायची आणि थोडीशी मैत्री झाली. तसंच गंभीर हा चांगल्या आणि श्रीमंत कुटुंबातून आला आहे. परंतु, तरीही त्यानं नेहमीच खेळाची आवड कायम ठेवली आणि दिवसभर मैदानावर कठोर परिश्रम घेतले, असंही चोप्रा म्हणाला.
हेही वाचा :