पुणे IND vs NZ 2nd Test : भारतीय क्रिकेट संघाचं काय चाललंय? ऑस्ट्रेलियात जाऊन मालिका जिंकण्याची तयारी सुरु असतानाच आता मायदेशातही कसोटी जिंकण्याची समस्या आहे. हे एका सामन्यात घडलं असतं तर ठीक झालं असतं, पण आता परत दोन सामन्यांत लाजिरवाणे दिवस बघावे लागणार आहेत. आता, भारतीय संघासोबत असं घडलं आहे जे 2001 मध्ये म्हणजे सुमारे 23 वर्षांपूर्वी घडलं होतं.
Innings Break! #TeamIndia all out for 156.
— BCCI (@BCCI) October 25, 2024
Scorecard ▶️ https://t.co/YVjSnKCtlI #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/K7ir5j4a6G
बेंगळुरु कसोटीत न्यूझीलंडकडं 356 धावांची आघाडी, पुण्यातही 103 धावांची आघाडी : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला बंगळुरु कसोटीपासून सुरुवात झाली. या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात केवळ 46 धावा करुन बाद झाला. त्या सामन्यात न्यूझीलंडनं भारतीय संघावर 356 धावांची आघाडी घेतली होती आणि ही आघाडी अखेर निर्णायक ठरली, भारताला सामना गमवावा लागला. एकच सामना झाला तर काही अडचण नाही, मात्र आता पुण्यातही जवळपास असंच घडलं. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं 356 धावांची आघाडी घेतली होती, तर दुसऱ्या सामन्यात 103 धावांची आघाडी घेतली. भारताविरुद्ध घरच्या मैदानावर सलग दोन सामन्यांत टीम इंडियावर 100 हून अधिक धावांची आघाडी घेण्यासाठी जगभरातील संघांना खूप प्रयत्न करावे लागले आहेत. यामुळंच गेल्या 23 वर्षांत असे घडले नाही.
2001 नंतर पहिल्यांदाच पाहावा लागला लाजिरवाणा दिवस : याआधी 2001 मध्ये शेवटच्या वेळी ऑस्ट्रेलियानं भारतीय संघावर सलग दोन सामन्यात आघाडी घेतली होती. तेव्हा मुंबईच्या वानखेडेवर ऑस्ट्रेलियानं 173 धावांची आघाडी घेतली होती आणि त्यानंतर कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर 274 धावांची आघाडी घेण्यात ऑस्ट्रेलियन संघाला यश आलं. तेव्हापासून आजतागायत भारतासोबत मायदेशात असं घडलं नव्हतं. पण आता अखेर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा दिवस पाहायला मिळाला. आता इथून सामना वाचवणं भारतासाठी अजिबात सोपं नाही.
INDIA BOWLED OUT FOR 156....!!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 25, 2024
- Mitchell Santner the hero with 7/53, New Zealand have a lead of 103 runs. 🤯 pic.twitter.com/gDVJiGw2Mb
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गाठणं होईल अवघड : मोठी गोष्ट म्हणजे भारतीय संघानं पुणे कसोटी सामना गमावला तर मालिका तर गमावली जाईलच, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरीही अडचणीत येईल. भारतीय संघ सध्या WTC पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. मात्र पुणे कसोटी सामना हरला तर मोठं नुकसान होणार आहे. त्यानंतर भारताला ऑस्ट्रेलियात जाऊन पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सर्व सामने जिंकावे लागतील. त्यामुळं दुसरा सामना अजून सुरु आहे, काहीही करुन हा सामना जिंकणं आवश्यक आहे, जेणेकरुन मालिका वाचवता येईल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल गाठता येईल.
हेही वाचा :