दुबई INDW vs SLW Live Streaming : ICC महिला T20 विश्वचषकाच्या बाराव्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. भारतीय संघ अ गटात आहे. भारतानं आतापर्यंत 2 सामने खेळले असून, ज्यात एक जिंकला आहे आणि एक पराभव झाला आहे. ते सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळं पहिल्या दोन सामन्यांमध्ये संमिश्र निकाल मिळालेला भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय नोंदवून आपली निव्वळ धावगती सुधारण्याचा प्रयत्न करेल.
Two matches. Two memorable results 🤗
— BCCI (@BCCI) October 6, 2024
A perfect Sunday Gift 🎁 for India from #TeamIndia 😃#INDvBAN | #INDvPAK | #T20WorldCup | #WomenInBlue pic.twitter.com/XvVEJt0gCw
भारताला मोठ्या विजयाची गरज : दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कारण गटातील शेवटच्या सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचा सामना करावा लागणार आहे. श्रीलंकेविरुद्ध भारताला केवळ विजयाची गरज नाही, तर मोठ्या विजयाची गरज आहे, जेणेकरुन त्यांची निव्वळ धावगती सुधारेल.
श्रीलंकेविरुद्ध सावध पवित्रा : तर दुसरीकडे श्रीलंकेला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. असं असूनही त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. विशेषत: ऑगस्टमध्ये आशिया कप फायनलमधील पराभवानंतर भारतीय संघ आपल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सावध असेल. आता श्रीलंकेचा संघ केवळ कर्णधार चमारी अटापट्टूवर अवलंबून नसून त्यांच्याकडे सामने जिंकणारे इतर खेळाडू आहेत हे भारतीय खेळाडूंना चांगलंच ठाऊक आहे.
हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : भारत विरुद्ध श्रीलंका T20 आंतरराष्ट्रीय सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघाचं पारडं जड दिसत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 25 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारतानं 19 सामने जिंकले असून श्रीलंकेनं 5 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. दोघांमधील शेवटच्या 5 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचं झाल्यास, भारतानं 3 आणि श्रीलंकेनं 2 जिंकले आहेत.
भारतीय संघाचा दुबईत रेकॉर्ड कसा : भारतीय महिला संघानं दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी एक जिंकला असून एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. या मैदानावर विकेट्सच्या बाबतीत सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. त्यानं 4 ऑक्टोबर 2024 रोजी वेस्ट इंडिजचा पराभव केला. या मैदानावर भारताचा हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 58 धावांनी पराभव झाला होता. महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय मधील या मैदानावरील धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय आहे.
खेळपट्टी कशी असेल : आतापर्यंत या मैदानावर 5.48 धावा प्रति षटक या दरानं 1785 धावा झाल्या असून 100 विकेट पडल्या आहेत. याचा अर्थ या मैदानावर मोठी धावसंख्या अपेक्षित नाही. या मैदानावर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 90 धावांची आहे. इथं दोन्ही डावात मिळून सर्वाधिक धावा 262 आहेत. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूची मदत मिळते. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंना मदत मिळू शकते.
हवामान कसं असेल : दुबईतील हवामानाबद्दल बोलायचं झालं तर, महिला T20 विश्वचषकातील भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याच्या दिवशी खूप उष्ण आणि सूर्यप्रकाश असेल. पावसाची शक्यता नाही. दिवसभर हवामान स्वच्छ राहील आणि चाहत्यांना पूर्ण सामना पाहायला मिळेल. सामन्यादरम्यान ताशी 24 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना कधी खेळला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना बुधवार, 9 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना कुठं खेळवला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई इथं होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना किती वाजता सुरु होईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07:30 वाजता सुरु होईल.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकाल.
दोन्ही संघ :
भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टिरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, दयालन हेमलता , आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजीवन सजना
श्रीलंकेचा महिला संघ : चमारी अटापट्टू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, विशामी गुणरत्ने, कविशा दिलशारी, नीलाक्षिका डी सिल्वा, हसिनी परेरा, अनुष्का संजीवनी (यष्टिरक्षक), सचिनी निसानसाला, उदेशिका प्रबोधनी, इनोशी प्रियदर्शिनी कुविरानी, इनोशी प्रियदर्शनी, अमा कांचना, सुगंधिका कुमारी.
हेही वाचा :