ETV Bharat / sports

भारताकडे आता वेगवान गोलंदाजांची चांगली 'बेंच स्ट्रेंथ' - माजी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे - Paras Mhambrey Interview - PARAS MHAMBREY INTERVIEW

Paras Mhambrey Interview : भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनी ईटीव्ही भारतच्या निखील बापट यांच्याशी विशेष बातचित केली. यावेळी त्यांनी भारत आता गोलंदाजीतही अधिक मजबूत असल्याचं सांगितलं.

Paras Mhambrey Interview
पारस म्हांबरे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 10:54 PM IST

हैदराबाद Paras Mhambrey Interview : भारत जागतिक दर्जाचे फलंदाज तयार करण्यासाठी ओळखला जातो. परंतु भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनी भारताची ही ओळख आता बदलल्याचं सांगितलंय. जेव्हा त्यांनी कनिष्ठ क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली, तेव्हा 'बेंच स्ट्रेंथ' तयार करण्याची त्यांची कल्पना होती आणि त्याचा फायदा झाला, कारण देशात आता वेगवान गोलंदाज मोठा प्रमाणात असल्याचं त्यांनी म्हटलंय.

पारस हे अमेरिका आणि वेस्ट इंडीज यांच्या संयुक्त विद्यमाने टी 20 विश्वचषक 2024 जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. 52 वर्षीय म्हांब्रे, ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या एका खास मुलाखतीत म्हणाले, "तुम्ही 'बेंच स्ट्रेंथ' म्हणून जे काही टॅलेंट पाहिलं आहे, ते जेव्हा आम्ही (कोचिंग) घेतले तेव्हा फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांच्या एकत्रित दृष्टिकोनातून 'बेंच स्ट्रेंथ' तयार करण्याची कल्पना होती. या कालावधीत, मी अनेक खेळाडूंना (देशाचं) प्रतिनिधित्व करताना पाहिलं आहे. त्यामुळं भारतात भरपूर प्रतिभा उपलब्ध आहे. आवेश खान, खलील अहमद आणि अर्श (अर्शदीप सिंग) चांगले गोलंदाज म्हणून समोर येत आहेत. (मोहम्मद) शमी, इशांत (शर्मा) आणि उमेश (यादव) तसंच (जसप्रीत) बुमराहला अनुभव होता. त्यामुळं मला वाटतं की नवीन टॅलेंट येण्याबद्दल मी खूप उत्सुक होतो. मयंक (यादव), मोहसीन खान आणि हर्षित राणा, कुलदीप (सेन), या सर्वांनी एक 'बेंच स्ट्रेंथ' तयार केली आहे."

पुढं बोलताना ते म्हणाले, "या खेळाडूंना संधी द्या, त्यांना मजबूत बनवण्यासाठी आणि त्यांना चांगलं खेळाडू बनवण्यासाठी दबाव आणि वेगवेगळ्या सामन्यांच्या परिस्थिती आणि परिस्थितींमध्ये त्यांची चाचणी घ्या. त्यामुळं खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची परवानगी देणं महत्त्वाचं आहे." तसंच तुमची 'बेंच स्ट्रेंथ' सुधारेल याची खात्री करणं हा मोठा भाग आहे," असंही म्हांबरे म्हणाले. भारतीय संघासह त्यांचा कार्यकाळ संपवणं हा एक विशेष क्षण होता. विश्वचषक जिंकणं हे विशेष आहे, परंतु आतापर्यंतचा संपूर्ण प्रवास खूप छान, फलदायी आणि समाधानकारक असल्याचं त्यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना त्यांनी भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचंही कौतुक केलं. त्यानं भारताला 2024 टी 20 विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. माजी गोलंदाजी प्रशिक्षक अर्शदीप सिंगच कौतुक करताना म्हणाले, "माझा अर्श (अर्शदीप सिंग) सोबतचा संबंध अंडर-19 च्या दिवसांपासून होता. 2018 मध्ये मी पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा तो आम्ही जिंकलेल्या अंडर 19 विश्वचषक संघाचा भाग होता. तेव्हापासून मी अनेकदा त्याच्याशी संवाद साधत होतो. तो खेळाच्या दोन कठीण टप्प्यांमध्ये गोलंदाजी करतो. तो एकदा नवीन चेंडूनं गोलंदाजी करतो आणि नंतर शेवटच्या षटकांत परत येतो. तो देशासाठी या टप्प्यांमध्ये सतत गोलंदाजी करत असतो, त्यामुळं तो जेव्हा गोलंदाजी करतो, तेव्हा त्याच्याशी बोलणं होतं. त्याच्या कौशल्यांबद्दल स्पष्टता आहे, म्हणूनच तो यशस्वी झाला आहे," असं म्हांबरे म्हणाले.

विविध संघांसोबत दोन दशकं घालवल्यानंतर, म्हांबरेंना आता आपल्या कुटुंबासोबत आपला वेळ घालवायचा आहे. परंतु ते यापुढंही त्यांना आवडत असलेल्या खेळासाठी योगदान देत राहील याची ग्वाही त्यांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं झिम्बाब्वेत फडकवला तिरंगा; शेवटच्या सामन्यातही दणदणीत विजय मिळवत 4-1 नं मालिका खिशात - ZIM vs IND 5th T20I

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.