ETV Bharat / sports

पाकिस्तानला धुळ चारत भारतानं पटकावलं 'WCL' चं विजेतेपद, अंबाती रायुडू ठरला विजयाचा शिल्पकार - WCL Final 2024

WCL Final 2024 : 'वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2024' स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला आहे. युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय चॅम्पियन्स संघाने वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स ट्रॉफी जिंकली आहे.

WCL Final 2024
WCL Final 2024 (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 8:44 AM IST

WCL Final 2024, India vs Pakistan : 'वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2024' क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. भारताच्या चॅम्पियन्सनं अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी करत पाकिस्तान चॅम्पियन्सला नमवलं. भारताचा सलामीचा फलंदाज अंबाती रायुडूला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब देण्यात आला. अंबाती रायडू हा अंतिम सामन्यात भारतीय संघाठी विजयाचा शिल्पकार ठरला.

पाकिस्तान चॅम्पियन्सची फलंदाजी : 'वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2024' स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत चॅम्पियन्सनं प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला 20 षटकांत 156 धावांवर रोखलं. भारतीय संघासाठी वेगवान गोलंदाज अनुरीत सिंगने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. याशिवाय भारताकडून विनय कुमार, पवन नेगी आणि इरफान पठाण यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. पाकिस्तानकडून शोएब मलिकनं सर्वाधिक 41 धावा केल्या.

अंबाती रायडूची दमदार खेळी : पाकिस्ताननं दिलेल्या 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय दिग्गज संघाला अंबाती रायडू आणि रॉबिन उथप्पा यांनी चांगली सुरुवात करून दिली. भारतासाठी अंबाती रायडूनं अंतिम सामन्यात 30 चेंडूत 50 धावा केल्या. अंबाती रायडूनं आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. रायडूच्या या खेळीमुळेच भारताला विजयापर्यंत जाणं सोपं झालं. याशिवाय गुरकीरत सिंग माननं 34 आणि युसूफ पठाणने 30 धावा केल्या. कर्णधार युवराज सिंगला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानं 22 चेंडूंमध्ये 15 धावा केल्या. भारतानं 19.1 षटकांत 5 गडी गमावून 159 धावा करत वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 च्या ट्रॉफी जिंकली. पाकिस्तानकडून आमिर यामीननं दोन विकेट घेतले. याशिवाय सईद अजमल, वहाब रियाझ आणि शोएब मलिक यांना प्रत्येकी 1 विकेट मिळविली.

दोन्ही संघ

  • पाकिस्तानचा संघ : युनूस खान (कर्णधार), कामरान अकमल (विकेटकीपर), शर्जील खान, सोहेब मकसूद, शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी, मिसबाह-उल-हक, आमेर यामीन, सोहेल तन्वीर, वहाब रियाझ आणि सोहेल खान.
  • भारताचा संघ : युवराज सिंग (कर्णधार), रॉबिन उथप्पा (विकेटकीपर), अंबाती रायुडू, सुरेश रैना, युसूफ पठाण, इरफान पठाण, पवन नेगी, विनय कुमार, हरभजन सिंग, राहुल शुक्ला आणि अनुरीत सिंग.

हेही वाचा

  1. ऋषभ पंतच्या दिल्लीत मोठा फेरबदल; आगामी आयपीएलपुर्वी दिग्गजानं तोडलं संघासोबत नात - Ricky Ponting
  2. बीसीसीआयनं अचानक बदललं श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक; आता 'या' तारखेपासून भारतीय क्रिकेटमध्ये 'गंभीर युगा'ला होणार सुरुवात - India vs Sri Lanka Series
  3. चौथ्या टी 20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय; 'यशस्वी' विजयासह मालिका खिशात - ZIM vs IND 4th T20I

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.