चेन्नई IND vs BAN 1st Test Day 2 : भारतीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात बांगलादेश पहिल्या डावात 149 धावांवर सर्वबाद झाला. त्यांच्याकडून शाकिब अल हसननं सर्वाधिक 32 धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. बुमराहशिवाय आकाश दीप, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. पहिल्या डावात भारताला 227 धावांची भक्कम आघाडी मिळाली.
Innings Break!
— BCCI (@BCCI) September 20, 2024
Four wickets for Bumrah and two apiece for Siraj, Akash Deep and Jadeja as Bangladesh are all out for 149 runs.
Trail by 227 runs.
Scorecard - https://t.co/jV4wK7BgV2… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/hT7IKyTlqW
आकाश दीपची धारदार गोलंदाजी : पहिल्या डावात बांगलादेशची सुरुवात खराब झाली. त्यांच्या पहिल्या 5 विकेट 40 धावांत पडले. बांगलादेशला डावाच्या पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहनं झटका दिला. शदमान इस्लाम (12) बुमराहच्या चेंडूला सोडण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू आतल्या बाजूनं आला आणि तो क्लीन बोल्ड झाला. यानंतर आकाश दीपची जादू सुरु झाली. त्यानं बांगलादेशी डावाच्या नवव्या षटकात लागोपाठ दोन चेंडूंवर झाकीर हसन (3) आणि मोमिनुल हक (2) यांना क्लीन बोल्ड केलं. एकेकाळी तो हॅट्ट्रिक घेण्याच्या स्थितीत होता, पण मुशफिकुर रहीमनं ती होऊ दिली नाही.
BANGLADESH BOWLED OUT FOR 149.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 20, 2024
- India with the lead of 227 runs. pic.twitter.com/y66ZGsRdQ1
बुमराहचे चार बळी : बांगलादेशचा चौथा गडी कर्णधार नझमुल हुसेन शांतो (20) मोहम्मद सिराजच्या चेंडूवर विराट कोहलीकडे स्लिपमध्ये बाद झाला. यानंतर काही वेळातच अनुभवी मुशफिकुर रहीम (8) बुमराहच्या चेंडूवर केएल राहुलकर्वी 8 धावांवर झेलबाद झाला. अशा प्रकारे बांगलादेशी संघाची धावसंख्या 40/5 झाली. यानंतर शाकिब अल हसन आणि लिटन दास (22) यांनी 51 धावांची भागीदारी केली. जाडेजाच्या चेंडूवर लिटन दासला बदली खेळाडू ध्रुव जुरेलनं झेलबाद केलं. त्याच्या पुढच्याच षटकात जडेजानं शकीबला (32) पंतकडे झेलबाद केलं. यानंतर बुमराहनं हसन महमूद (9) आणि खालच्या फळीत खेळायला आलेल्या तस्किन अहमदला आपला बळी बनवलं. नाहिद राणाला (11) आऊट करत सिराजनं शेवटची विकेट घेतली.
हेही वाचा :