मुंबई ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC टेस्ट बॅटर रँकिंग) ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाच्या तीन फलंदाजांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. बांगलादेशसोबत मालिका सुरु होण्यापूर्वी भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे.
- Rohit Sharma at No.5.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 11, 2024
- Yashasvi Jaiswal at No.6.
- Virat Kohli at No.7.
Indian batters in the Top 10 of ICC Test Ranking. A much awaited Test season ahead for the 3 guns! 🇮🇳 pic.twitter.com/fjTOvfyAmk
तिन्ही फलंदाजांची एका स्थानानं प्रगती : ICC च्या ताज्या कसोटी क्रमवारीत रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आला आहे. तर यशस्वी जैस्वाल सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. कसोटी क्रमवारीत विराट कोहली सातव्या क्रमांकावर आहे. हे 3 भारतीय फलंदाज ICC कसोटी क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये आहेत. विशेष म्हणजे तिन्ही फलंदाजांच्या क्रमवारीत एका स्थानाची झेप घेतली आहे.
Pathum Nissanka jumps 42 spots to become 39th Ranked Test batter.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 11, 2024
- A dream Oval Test for Nissanka! pic.twitter.com/qGsjb5Vvit
आयसीसी क्रमवारीत श्रीलंकेच्या खेळाडूंना फायदा : ताज्या ICC कसोटी क्रमवारीत श्रीलंकेच्या अनेक खेळाडूंनी मोठं यश संपादन केलं आहे. ओव्हल इथं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी विजयानंतर श्रीलंकेच्या सहा खेळाडूंनी ताज्या ICC पुरुषांच्या कसोटी क्रमवारीत नवीन कारकीर्दीतील उच्च रँकिंग गाठलं आहे. श्रीलंकेनं नुकत्याच संपलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध घराबाहेरील पहिला कसोटी विजय नोंदवला, ज्यात कर्णधार धनंजय डी सिल्वा, मधल्या फळीतील फलंदाज कामिंडू मेंडिस आणि सलामीवीर पथुम निसांका या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. श्रीलंकेचा सर्वाधिक धावा करणाऱ्या डी सिल्वाला त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवण्यात मदत झाली आणि कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत तो 13 व्या स्थानावर पोहोचला. आता तो आपल्या संघाच्या फलंदाजांच्या यादीत अव्वल खेळाडू आहे.
जो रुट अव्वल स्थानी कायम : इंग्लंडच्या जो रुटनं ओव्हलवर केवळ 13 आणि 12 धावा केल्या. तरीही तो कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तथापि, रुटचं रेटिंग 922 गुणांवरुन 899 पर्यंत घसरलं आहे आणि यामुळं न्यूझीलंडच्या केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथसारख्या फलंदाजांना त्याच्या जवळ जाण्याची संधी मिळाली आहे. हीच गोष्ट इंग्लंडच्या हॅरी ब्रूकची आहे, या उजव्या हाताच्या फलंदाजानं श्रीलंकेविरुद्ध 19 आणि तीन धावा केल्यानंतर सात स्थानांनी घसरुन 12व्या स्थानावर पोहोचला आहे.
हेही वाचा :