मुलतान Playing 11 Announced : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची खेळवली जात आहे. यातील पहिला सामना एक डाव आणि 47 धावांनी जिंकल्यामुळं इंग्लंडनं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामनाही मुलतानला खेळवला जाणार आहे. ज्यासाठी इंग्लंडनं आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. यात मोठी अपडेट म्हणजे नियमित कर्णधार बेन स्टोक्सनं संघात पुनरागमन केलं आहे, कारण दुखापतीमुळं तो पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही. तर मॅथ्यू पॉट्सचं संघात पुनरागमन झालं आहे.
Two changes ✅
— England Cricket (@englandcricket) October 14, 2024
We've announced our team for the second Test against Pakistan in Multan 👇
दोन खेळाडू बाहेर : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून दोन खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. यात गस ऍटकिन्सन आणि ख्रिस वोक्स यांचा समावेश आहे. मुलतानमधील पहिल्या कसोटी सामन्यात ॲटकिन्सन आणि वोक्स यांनी अनुक्रमे 39 आणि 35 षटकं टाकली. दुसरीकडे बेन स्टोक्सच्या पुनरागमनानंतर इंग्लंड संघाला बळ मिळणार आहे. तो त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यानं इंग्लंड संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. मात्र तो गोलंदाजी करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हॅरी ब्रूकनं झळकावलं पहिल्या कसोटीत त्रिशतक : पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघानं प्रथम फलंदाजी करताना 556 धावा केल्या होत्या. यानंतर गोलंदाज आणि फलंदाजांनी इंग्लंड संघासाठी अप्रतिम कामगिरी केली. हॅरी ब्रूकनं त्रिशतक झळकावलं होतं, तर जो रुटनं द्विशतक केलं होतं. त्यामुळं इंग्लंडनं 823 धावा करुन डाव घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या डावात पाकिस्तानचे फलंदाज फ्लॉप ठरले आणि इंग्लंडचे गोलंदाज 10 बळी घेण्यात यशस्वी ठरले. पाकिस्ताननं दुसऱ्या डावात केवळ 220 धावा केल्या आणि पहिल्या कसोटीत संघाचा पराभव झाला.
CAPTAIN BEN STOKES. 🔥
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2024
- Stokes will return and lead England in the 2nd Test Vs Pakistan. pic.twitter.com/mtMCgfMFw5
बाबर आझमसारखे स्टार खेळाडू बाहेर : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी संघ चांगली कामगिरी करत नाही. शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ सलग 6 कसोटी सामने हरला असून संघाला विजय मिळवता आलेला नाही. याच कारणामुळं पाकिस्ताननं बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह या खेळाडूंना दुसऱ्या कसोटीसाठी बाहेरचा रस्ता दाखवला असून त्यांच्या जागी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन :
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रुट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ब्रायडन कार्स, मॅट पॉट्स, जॅक लीच, शोएब बशीर
हेही वाचा :