ETV Bharat / sports

बापरे बाप! इंग्लंडच्या 'या' वेगवान गोलंदाजानं एकाच षटकात दिल्या तब्बल 43 धावा, केला लाजिरवाणा विक्रम - Ollie Robinson - OLLIE ROBINSON

Ollie Robinson Record : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये कधीही काहीही होऊ शकतं. असंच काहीसं इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं. इंग्लंडसाठी आतापर्यंत 20 कसोटी खेळलेला वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सननं एका षटकात तब्बल 43 धावा दिल्या आहेत.

Ollie Robinson Record
ऑली रॉबिन्सन (Etv Bharat)
author img

By PTI

Published : Jun 26, 2024, 9:18 PM IST

लंडन Ollie Robinson Record : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सननं बुधवारी काउंटी चॅम्पियनशिपच्या एका सामन्यात तब्बल 43 धावा देत प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील दुसरं सर्वात महागडं षटक टाकण्याचा लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला. वेगवान गोलंदाज रॉबिन्सन यानं 2021 मध्ये पदार्पण केल्यानंतर इंग्लंडकडून 20 कसोटी सामने खेळले आहेत. होव्ह इथं ससेक्सकडून खेळताना लीसेस्टरशायरविरुद्धच्या सामन्यात त्यानं एका षटकात एकूण 43 धावा दिल्या.

एका षटकात दिल्या 43 धावा : लीसेस्टरशायरच्या लुईस किम्बरनं रॉबिन्सनच्या चेंडूवर पाच षटकार (नो बॉलवर तीन), तीन चौकार आणि एक धावा ठोकत 43 धावा केल्या. लीसेस्टरशायरच्या दुसऱ्या डावातील हे 59वं षटक होतं, जेव्हा किम्बर 56 चेंडूत 72 धावांवर फलंदाजी करत होता. लीसेस्टरशायरनं ससेक्ससमोर 446 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. रॉबिन्सननं हे षटक पूर्ण केल्यानंतर किम्बरच्या 65 चेंडूत नाबाद 109 धावा झाल्या होत्या. दुसऱ्या बाजूला बेन कॉक्स फलंदाजी करत होता. रॉबिन्सनचं हे 13 वं षटक होतं, ज्यात 6, 6 नो बॉल, 4, 6, 4, 6, 4, 6 नो बॉल आणि एक रन झाली.

ॲलेक्स ट्यूडरचा विक्रम मोडीत : अशाप्रकारे रॉबिन्सननं इंग्लंडकडून सर्वाधिक धावा देण्याचा विक्रमही मोडीत काढला. त्यानं माजी कसोटी वेगवान गोलंदाज ॲलेक्स ट्यूडरचा 38 धावांचा विक्रम मागं टाकला. 1998 च्या सरे विरुद्ध लँकेशायर सामन्यात अँड्र्यू फ्लिंटॉफनं ट्यूडरच्या षटकात 34 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक 1990 मध्ये टाकण्यात आलं होतं. वेलिंग्टन आणि कँटरबरी यांच्यातील शेल ट्रॉफी सामन्यादरम्यान, न्यूझीलंडचा माजी ऑफ-ब्रेक गोलंदाज व्हर्ट व्हॅन्सनं त्या षटकात 17 नो-बॉल टाकत 77 धावा दिल्या होत्या. व्हॅन्सनं न्यूझीलंडकडून चार कसोटी आणि आठ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा :

  • रॉबर्ट व्हॅन्स : 77 धावा - वेलिंग्टन विरुद्ध कँटरबरी
  • ऑली रॉबिन्सन : 43 धावा - ससेक्स विरुद्ध लीसेस्टरशायर
  • ॲलेक्स ट्यूडर : 38 धावा - सरे विरुद्ध लँकेशायर
  • शोएब बशीर : 38 धावा - वूस्टरशायर विरुद्ध सरे
  • माल्कम नॅश : 36 धावा - ग्लॅमॉर्गन विरुद्ध नॉटिंगहॅमशायर

हेही वाचा :

  1. आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल; आता 'या' दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान - Asia Cup 2024 Schedule
  2. गुलबदिन नायबच्या ‘ॲक्टिंग’वर खेळाडू संतापले; अशा प्रकारे उडवली खिल्ली - Gulbadin Naib Fake Injury
  3. ऑस्ट्रेलियाच्या टी 20 विश्वचषकातील प्रवास संपताच डेव्हिड वॉर्नरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम - David Warner retired

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.