Wimbledon 2024 Final : टेनिसमधील सर्वात प्रतिष्ठित विम्बल्डन 2024 चा अंतिम सामना रविवारी (14 जुलै) खेळण्यात आला. या सामन्यात 21 वर्षीय स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्कराझनं तुफानी कामगिरी करत इतिहास रचला आहे. त्यानं अंतिम सामन्यात सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-2, 7-6 असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं आहे. कार्लोसनं सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनं जेतेपद पटकाविलं आहे. नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्काराझ हे गेल्या वर्षी विम्बल्डनच्या फायनलमध्येही आमनेसामने होते. त्यावेळी कार्लोसनं जोकोविचचाच पराभव करून आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं होतं.
कार्लोसचं चौथं ग्रँडस्लॅम जेतेपद : अल्काराझच्या कारकिर्दीतील हे त्याचं चौथं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. कार्लोसने आतापर्यंत दोनदा विम्बल्डन, एकदा फ्रेंच ओपन आणि एकदा यूएस ओपनची फायनल गाठली आहे. त्यानं चारही वेळा विजय मिळवला आहे. जोकोविचचा विम्बलडन स्पर्धेच्या अंतिम फेरीतील हा 8वा पराभव आहे. 24 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता जोकोविचने हे विजेतेपद पटकावलं असत तर एका विक्रमाची नोंद झाली असती. विम्बलडन स्पर्धेत ग्रँडस्लॅम जिंकणारा तो सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला असता.
To win here is special. To defend here is elite.
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2024
Carlos Alcaraz is the 2024 Gentlemen’s Singles Champion 🏆#Wimbledon pic.twitter.com/kJedyXf0vn
जोकोविचनं कडवी झुंज दिली पण... : अल्काराझ आणि जोकोविच यांच्यातील हा जेतेपदाचा सामना 2 तास 27 मिनिटे चालला. या सामन्यात अल्काराझनं सुरुवातीपासूनच आपलं वर्चस्व राखलं. पहिले दोन सेट त्याने जिंकले होते. यानंतर तिस-या सेटमध्ये जोकोविच संघर्ष करताना दिसला, पण त्याला सेट जिंकता आला नाही. तिसरा सेट रोमांचक राहिला. ज्यात अल्काराझ 5-4 ने आघाडीवर होता. परंतु जोकोविचनं कडवी झुंज देत हा सेट 6-6 असा बरोबरीत आणत टायब्रेकमध्ये नेला. पण इथं पुन्हा अल्काराझनं शानदार प्रदर्शन केलं. टायब्रेकरमध्ये अल्काराझनं 7-4 गुणांच्या फरकानं हा सेट जिंकला. तिसरा सेट 7-6 असा जिंकून अल्काराझनं विजेतेपदावर नाव कोरलं.
An indescribable feeling… 🏆#Wimbledon pic.twitter.com/9JcL46RrGd
— Wimbledon (@Wimbledon) July 15, 2024
विजेतेपद पटकावल्यानंतर कार्लोसची प्रतिक्रिया : सामन्यानंतर बोलताना कार्लोस म्हणाला की, "ही ट्रॉफी जिंकणं हे माझ्यासाठी एक स्वप्न आहे. या कोर्टवर खेळणे आणि ही अप्रतिम ट्रॉफी उचलणे हा खूप आनंददायी भावना आहे. माझ्यासाठी हे खूप अवघड होतं. मी कठीण परिस्थितीत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला. टायब्रेकमध्ये सामना गेल्यानंतर मी माझा सर्वोत्तम खेळण्याचा प्रयत्न केला. मी ट्रॉफी जिंकल्याचा मला खूप आनंद झाला."
An outrageous rally and sliding Alcaraz finish 😮💨
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2024
This point had to be today's Play of the Day, presented by @BarclaysUK#Wimbledon pic.twitter.com/5TK6siGB60
- जोकोविचची प्रतिक्रिया : जोकोविच म्हणाला, " नक्कीच मला हवा होता तसा निकाल लागला नाही. विशेषत: पहिल्या दोन सेटमध्ये, माझ्या बाजूनं काहीच नव्हतं. कार्लोस अल्काराझ आज खरोखरच योग्य विजेता होता. त्यामुळं त्याच्या अप्रतिम खेळीबद्दल त्याचं अभिनंदन!"
- सचिन तेंडुंलकरनं केलं कौतुक : भारतरत्न सचिन तेंडुलकरनं कार्लोस अल्काराझच्या कामगिरीचं कौतुक केलं. जागतिक दर्जाच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सरळ सेटमध्ये अंतिम फेरीत खेळणं म्हणजे विनोद नाही. आतापासून टेनिसमध्ये कार्लोसचंच राज्य चालणार आहे, असं म्हणत सचिननं त्याचं कौतुक केलं.
𝘈𝘣𝘴𝘦 𝘵𝘦𝘯𝘯𝘪𝘴 𝘱𝘦 𝘦𝘬 𝘩𝘪 𝘳𝘢𝘫 𝘬𝘢𝘳𝘦𝘨𝘢, 𝘸𝘰𝘩 𝘩𝘢𝘪 𝘈𝘭𝘤𝘢𝘳𝘢𝘻.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 14, 2024
Winning the @Wimbledon finals in straight sets against a world-class opponent is no joke. With that kind of speed, power, placement, and energy, it looks like it's going to be Advantage… pic.twitter.com/fqINU1HxOr
सर्वाधिक ग्रँडस्लॅम (महिला आणि पुरुष एकेरी)
- नोव्हाक जोकोविच (पुरुष-सर्बिया) – 24 (ऑस्ट्रेलियन-10, फ्रेंच-3, विम्बल्डन-7, यूएस-4)
- मार्गारेट कोर्ट (महिला-ऑस्ट्रेलिया) – 24 (ऑस्ट्रेलियन-11, फ्रेंच-5, विम्बल्डन-3, यूएस-5)
- सेरेना विल्यम्स (महिला-यूएसए)- 23 (ऑस्ट्रेलियन-7, फ्रेंच-3, विम्बल्डन-7, यूएस-6)
- राफेल नदाल (पुरुष- स्पेन) – 22 (ऑस्ट्रेलियन-2, फ्रेंच-14, विम्बल्डन-2, यूएस-4)
- स्टेफी ग्राफ (महिला-जर्मनी)- 22 (ऑस्ट्रेलियन-4, फ्रेंच-6, विम्बल्डन-7, यूएस-5)
- रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड) – 20 (ऑस्ट्रेलियन-6, फ्रेंच-1, विम्बल्डन-8, यूएस-5)
Back-to-back @carlosalcaraz 👑
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2024
Read the full report on the Alcaraz v Djokovic Gentlemen's Singles final:#Wimbledon
सर्वाधिक ग्रँड स्लॅम फायनल सामना खेळलेले खेळाडू (पुरुष एकेरी)
- 37- नोव्हाक जोकोविच
- 31- रॉजर फेडरर
- 30- राफेल नदाल
- 19- इव्हान लेंडल
- 18- पीट सॅम्प्रास
हेही वाचा
- कर्करोगानं त्रस्त असलेल्या अंशुमन गायकवाडांच्या उपचारासाठी बीसीसीआय करणार मोठी मदत - bcci
- शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं झिम्बाब्वेत फडकवला तिरंगा; शेवटच्या सामन्यातही दणदणीत विजय मिळवत 4-1 नं मालिका खिशात - ZIM vs IND 5th T20I
- वाह रे पठ्ठ्या..! यशस्वी जैस्वालनं डावाच्या पहिल्याच चेंडूवर रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय टी 20 इतिहासातील पहिलाच खेळाडू - Yashwai Jaiswal Record