ETV Bharat / sports

बीसीसीआयकडून खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर, श्रेयस अय्यरसह इशान किशनची काढली विकेट - शान किशन

BCCI and Players Annual Contract : BCCI नं 2023-24 च्या वार्षिक खेळाडूंचा करार जाहीर केलाय. यामध्ये अनेक युवा खेळाडूंचं नशीब पालटलं आहे. तर, बीसीसीआयच्या नियमांकडं दुर्लक्ष केल्यामुळं श्रेयस अय्यर, इशान किशन यांना करारातून वगळण्यात आलं आहे. यात युवा खेळाडू यशस्वी जयस्वालची लॉटरी लागली आहे. त्याचा बी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे.

BCCI and Players Annual Contract
BCCI and Players Annual Contract
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 8:52 PM IST

नवी दिल्ली BCCI and Players Annual Contract : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) बुधवारी 2023-24 हंगामातील खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर केलाय. हे करार भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघासाठी 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत लागू असतील. या करारामध्ये एकूण 30 खेळाडूंचा समावेश आहे. यात केवळ चार खेळाडूंना A+ श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे. तर युवा खेळाडू यशस्वी जैस्वालचा बी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे. करारात ग्रेड A+, ग्रेड A, ग्रेड B आणि ग्रेड C मध्ये असं वर्गीकरण करण्यात आलं आहे. तसंच त्यांचं वार्षिक उत्पन्न श्रेणींनुसार ठरविण्यात आलं आहे.

अय्यर, इशान करारातून बाहेर : बीसीसीआयनं फलंदाज श्रेयस अय्यर तसंच यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन यांना या करारातून वगळलं आहे. याव्यतिरिक्त, जे खेळाडू चालू कालावधीत किमान 3 कसोटी किंवा 8 एकदिवसीय सामने किंवा 10 T20 खेळण्याचे निकष पूर्ण करतात. त्यांना सी ग्रेडमध्ये समाविष्ट केलं जाईल. यात ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांनी आतापर्यंत 2 कसोटी सामने खेळले आहेत. जर ते धर्मशाला कसोटी सामन्यात भारतीय संघात समाविष्ट असल्यास त्यांना C ग्रेडमध्ये समाविष्ट केलं जाईल.

  • A+ ग्रेड (4 खेळाडू)

रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा

  • ग्रेड A (6 खेळाडू)

आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या

  • ग्रेड ब (५ खेळाडू)

सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.

  • ग्रेड क (१५ खेळाडू)

रिंकू सिंग, टिळक वर्मा, रुतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

  • वेगवान गोलंदाज कराराची शिफारस : त्याचवेळी राष्ट्रीय निवड समितीनं बीसीसीआयकडं वेगवान गोलंदाज कराराची शिफारस केली आहे. आकाश दीप, विजयकुमार वैश्यक, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वथ कावेरप्पा या गोलंदाजांचा यात समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूंची शिफारस करण्यात आली आहे.

हे वाचलंत का :

  1. देशातील पहिल्या महिला पिच क्युरेटर कोण आहेत? जय शाह यांनीदेखील केलं कौतुक
  2. रांची कसोटी जिंकत मालिकाही भारताच्या खिशात; 'बॅझबॉल'च्या युगात साहेबांचा पहिलाच मालिका पराभव
  3. जैस्वालनं रचला इतिहास! विक्रमी खेळी करत थेट दिग्गज 'डॉन ब्रॅडमन'च्या पंक्तीत मिळवलं स्थान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.