सेंट व्हिन्सेंट BAN Whitewashes WI in T20I : वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत बांगलादेशनं व्हाईटवॉश केला आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात यजमान संघाचा 80 धावांनी पराभव करत त्यांनी हा पराक्रम केला. याआधी बांगलादेशनं पहिला T20 सामना 7 धावांनी जिंकला होता. तर दुसऱ्या T20 मध्ये 27 धावांनी विजय मिळवला होता. बांगलादेशनं तिसरी T20 सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र ते 109 धावा करु शकले. त्यांचा डाव 17व्या षटकातच संपला. अशाप्रकारे बांगलादेशनं प्रथमच परदेशात खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत व्हाईटवॉश करण्यात यश मिळवले.
First clean sweep in an away T20i series against the West Indies🏏🇧🇩🔥
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 20, 2024
PC: CWI#BCB | #Cricket | #BANvWI | #T20 pic.twitter.com/6Xrp4PgBpj
बांगलादेशनं केल्या 189 धावा : तिसऱ्या T20 मध्ये प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशनं 20 षटकांत 7 विकेट गमावत 189 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या झाकीर अलीनं बांगलादेशकडून सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 41 चेंडूत 6 षटकारांसह नाबाद 72 धावा केल्या. बांगलादेशकडून झाकीर अली हा एकमेव खेळाडू होता, ज्यानं सामन्यात अर्धशतक झळकावलं.
A disappointing end to a compelling series 🏏#WIvBAN | #WIHomeForChristmas pic.twitter.com/b0De52ffhM
— Windies Cricket (@windiescricket) December 20, 2024
190 धावांच्या लक्ष्यासमोर वेस्ट इंडिजचा पराभव : प्रत्युत्तरात यजमान वेस्ट इंडिजचा संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा सुरुवातीपासूनच त्यांची अवस्था वाईट होती. 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना निम्मा संघ अवघ्या 46 धावांत गारद झाला यावरुन वेस्ट इंडिजच्या खराब स्थितीचा अंदाज येतो. संघाच्या खराब स्थितीत आणखी काही सुधारणा झाली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण संघ 16.4 षटकांत सर्वबाद झाला. म्हणजे यजमान वेस्ट इंडिजला पूर्ण 20 षटकंही खेळता आली नाहीत.
A big chase ahead for the #MenInMaroon 🏏🎄#WIvBAN | #WIHomeForChristmas pic.twitter.com/oxPI9AhdFm
— Windies Cricket (@windiescricket) December 20, 2024
वेस्ट इंडिज सलग तिसऱ्यांदा धावांचा पाठलाग करताना अपयशी : लक्ष्याचा पाठलाग करण्यात वेस्ट इंडिजचा संघ अपयशी ठरण्याची T20 मालिकेतील ही सलग तिसरी वेळ आहे. पहिल्या T20 सामन्यात त्यांना 148 धावांचा पाठलाग करता आला नाही. तर दुसऱ्या T20 मध्ये बांगलादेशच्या गोलंदाजांनी त्यांना 130 धावांचा पाठलाग करण्यापासून रोखलं होतं.
Three from three for Bangladesh and a series sweep in the Caribbean 🙌
— ICC (@ICC) December 20, 2024
📝 #WIvBAN: https://t.co/MuOf0oMkGz pic.twitter.com/NO4cymvTeR
बांगलादेशच्या विजयाचे हिरो कोण : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20I मध्ये बांगलादेशच्या विजयाचा नायक झाकीर अली होता, ज्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. तर या मालिकेत 37 धावा आणि 8 विकेट्स घेणाऱ्या मेहदी हसनला टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडूचा किताब देण्यात आला.
हेही वाचा :