नवी दिल्ली Bangladesh Squad Against India : बांगलादेशनं भारताविरुद्ध 19 सप्टेंबरपासून होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी 16 खेळाडूंना संघात ठेवण्यात आलं आहे. ज्याचं नेतृत्व नझमुल हसन शांतो करणार आहे. बांगलादेश संघानं नुकताच पाकिस्तानविरुद्ध 2-0 असा ऐतिहासिक विजय नोंदवला होता. या दौऱ्यावर गेलेल्या सर्व खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळं संघात फारसा बदल झालेला नाही. वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लाम जखमी झाला आहे. त्यामुळं त्याच्या जागी झाकेर अलीचा संघात समावेश करण्यात आला आहे.
Bangladesh have named a 16-player squad for this month's Test series against India 👀 #INDvBAN | #WTC25https://t.co/2iM9EGoRPL
— ICC (@ICC) September 12, 2024
बांगलादेश संघात कोणाचा समावेश : पाकिस्तानप्रमाणेच झाकीर हसन आणि शादमान इस्लाम भारताविरुद्धही सलामीची जबाबदारी घेतील. कर्णधार नजमुल शांतो बांगलादेशला तिसऱ्या क्रमांकावर मजबूत करेल. याशिवाय संघात मोमिनुल हक, मुशफिकुर रहमान आणि महमुदुल हसन जॉय यांचा फलंदाज म्हणून समावेश आहे, तर लिटन दास यष्टीरक्षण करताना दिसणार आहे. शरीफुल इस्लामच्या जागी आलेला झाकेर अली संघाचा दुसरा यष्टिरक्षक फलंदाज असेल. तर शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज हे फिरकी अष्टपैलू म्हणून राहतील. तस्किन अहमद, हसन महमूद, सय्यद खालिद अहमद आणि नाहिद राणा हे संघाचे चार प्रमुख वेगवान गोलंदाज असतील. याशिवाय नईम हसन आणि तैजुल इस्लाम हे आणखी दोन फिरकीपटू संघात आहेत.
बांगलादेशचा पूर्ण संघ : नजमुल हसन शांतो (कर्णधार), झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहमान, महमुदुल हसन जॉय, लिटन दास (यष्टीरक्षक), झाकेर अली (यष्टीरक्षक), शकीब अल हसन, मेहदी हसन मिराज, नईम हसन, तैजुल इस्लाम, तस्किन. अहमद, हसन महमूद, सय्यद खालिद अहमद, नाहिद राणा.
Bangladesh Test Squad for the India Tour 2024#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #INDvsBAN pic.twitter.com/1npeXGgkix
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 12, 2024
भारताविरुद्ध बांगलादेशची कामगिरी : बांगलादेशचा संघ यापूर्वी 2019-20 मध्ये 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा भारतानं बांगलादेशचा 2-0 असा पराभव केला. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात भारतानं 11 सामने जिंकले असून 2 सामने अनिर्णित राहिले. म्हणजेच बांगलादेशचा संघ अजूनही कसोटीत भारताला पराभूत करु शकलेला नाही. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर कर्णधार शांतोसह संपूर्ण संघ आत्मविश्वासानं भारतात येत आहे. भारताविरुद्धच्या कसोटीतही पहिला विजय नोंदवण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतील.
Bangladesh's Test squad for India:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 12, 2024
Shanto (C), Litto, Mushfiqur, Shakib, Mahmudul, Zakir, Shadman, Mominul, Mehidy, Taijul, Nayeem, Nahid, Mahmud, Taskin, Khaled and Jaker Ali. pic.twitter.com/hOczCKhwfq
WTC गुणतालिकेत कोण कोणत्या स्थानावर : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सध्याच्या फेरीत एकूण 9 संघ शर्यतीत होते. बांगलादेशकडून मालिका गमावल्यानंतर पाकिस्तानचा संघ या शर्यतीतून बाहेर पडला आहे. उर्वरित 8 संघांमध्ये भारतीय संघ 68.52 टक्के गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर बांगलादेशचा संघ 45.83 टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे.
शाकिबवर हत्येचा आरोप : बांगलादेशात मोठ्या प्रमाणात झालेल्या निदर्शनांमुळं पंतप्रधान शेख हसीन यांची सत्ता गेली आणि त्यांना एका रात्रीत स्वतःच्या देशातून पळून जावं लागलं. यानंतर आंदोलन आणखी तीव्र झालं, ज्यात 400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. यावेळी शाकिबसह 147 जणांवर एका विद्यार्थ्याची हत्या केल्याचा आरोप आहे. मृत विद्यार्थ्याच्या वडिलांच्या वतीनं क्रिकेटपटूविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. वास्तविक, 5 ऑगस्ट रोजी झालेल्या गोळीबारात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. यानंतर विद्यार्थ्याच्या वडिलांनी वकिलांच्या मदतीनं बांगलादेश बोर्डाला नोटीसही बजावली होती.
हेही वाचा :
- क्रिकेटच्या इतिहासातील असे कसोटी सामने ज्यात खेळाडूंनी नव्हे तर इंद्रदेवांनी केली 'बॅटिंग' - Test Matches Abandoned Without Toss
- अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी सामना रद्द झाल्यास WTC च्या पॉइंट टेबलवर काय होणार परिणाम? भारताला फायदा की नुकसान? - WTC Point Table Update
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना भारतात कुठं बघता येईल लाईव्ह, वाचा सर्व अपडेट एका क्लिकवर - ENG vs AUS 1st t20i live in india