मेलबर्न AUS vs PAK 1st ODI Live Streaming : ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज 4 नोव्हेंबर (सोमवार) रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न इथं खेळला जाईल. सप्टेंबरमध्ये इंग्लंडवर 3-2 असा रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियन या मालिकेत प्रवेश करेल. तसंच आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवरही त्याची नजर असेल. दरम्यान, मैदानावर संघाचं नेतृत्व करण्यासाठी पाकिस्तानकडं नवे प्रशिक्षक जेसन गिलेस्पी आणि नवा कर्णधार मोहम्मद रिझवान असेल. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत आहे. या संघात जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क सारख्या अव्वल खेळाडूंचा समावेश आहे.
🎥 Keeping it busy in the nets session!
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 3, 2024
Preparing for the first ODI against Australia tomorrow 🏏#AUSvPAK pic.twitter.com/SafkcQgnCo
मैदानाची खेळपट्टी कशी असेल : मेलबर्न क्रिकेट मैदानाची खेळपट्टी अतिशय स्पर्धात्मक मानली जाते. ही गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही चांगलं संतुलन प्रदान करते. खेळाच्या सुरुवातीला गोलंदाजांना खेळपट्टीचा फायदा मिळू शकतो. तथापि, जसजसा खेळ पुढं जातो आणि खेळपट्टी जुनी होत जाते, तसतसे फलंदाज त्यांचे शॉट्स अधिक सहज खेळू शकतात. मात्र, या खेळपट्टीतून फिरकीपटूंना फारशी मदत मिळणं सामान्यपणे कठीण जाते. तथापि, 1996 पासून, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आपल्या सामन्यांसाठी ड्रॉप-इन खेळपट्ट्या वापरत आहे.
The meetup before the face-off 🏏
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 3, 2024
Shaheen Shah Afridi 🤝 Mitchell Starc#AUSvPAK pic.twitter.com/zSnrTvGED7
मेलबर्न क्रिकेट मैदानावरील एकदिवसीय सामन्यांची आकडेवारी : मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आतापर्यंत एकूण 160 वनडे सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 78 वेळा विजय मिळवला आहे, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं 77 वेळा विजय मिळवला आहे. याशिवाय या मैदानावर एक सामना बरोबरीत राहिला असून चार एकदिवसीय सामन्यांमध्ये निकाल लागलेला नाही.
The men’s national selection committee has confirmed Pakistan’s playing XI for the first ODI against Australia.#AUSvPAK pic.twitter.com/kxiX9E2OGc
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 3, 2024
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 108 एकदिवसीय सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने या हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये चांगली कामगिरी केली आहे, ज्यात त्यांनी 70 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला 34 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. याशिवाय 3 सामन्यांचा निकाल लागला नाही. तर एक सामना बरोबरीत संपला आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पाकिस्तानची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली आहे. पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या 56 एकदिवसीय सामन्यांपैकी केवळ 17 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला काहीतरी विक्रमी कामगिरी करावी लागणार आहे.
One practice at a time as we look to take on Australia in the ODI series! 🌟🏏#AUSvPAK pic.twitter.com/xGgOvOGebg
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 2, 2024
ऑस्ट्रेलियात पाकिस्तानचा संघर्ष : मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानला मागील विक्रम बदलण्याची संधी आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन संघ आपल्या घरच्या मैदानावर नेहमीच मजबूत प्रतिस्पर्धी राहिला आहे. 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या वनडे सामन्यात, ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव केला होता, त्यामुळं मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली संघ कसा पुनरागमन करतो हे पाहणं मनोरंजक असेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान पहिला वनडे कधी आणि कुठं खेळला जाईल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 4 नोव्हेंबर (सोमवार) रोजी मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतीय वेळेनुसार सकाळी 09:00 वाजता खेळवला जाईल. या सामन्याची नाणेफेक सकाळी 08:30 वाजता होईल.
Team 🇵🇰 getting ready for the ODI showdown 🏏#AUSvPAK pic.twitter.com/vYwZd8Xads
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 2, 2024
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान पहिल्या वनडे सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्ट कुठं आणि कसं पहावं?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान वनडे मालिकेचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. भारतात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान पहिल्या वनडेचं थेट प्रक्षेपण पाहण्यात स्वारस्य असलेल्या चाहत्यांना ते स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेलवर पाहता येईल. तसंच चाहते डिस्ने+ हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान पहिल्या वनडे सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन पाहू शकतात.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन :
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, आगा सलमान (उपकर्णधार), मोहम्मद इरफान खान, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि मोहम्मद हसनैन
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्टीव्ह स्मिथ, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा
हेही वाचा :