मुंबई ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या क्रमवारीत भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. शुक्रवारी जाहीर झालेल्या वार्षिक रँकिंग अपडेटमध्ये, भारतानं एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये आपलं पहिलं स्थान कायम राखलं. परंतु, कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरले आहे. 2020-21 सत्राचे निकाल वार्षिक अपडेटमध्ये काढले गेले आहेत. नवीन क्रमवारीत मे 2021 नंतर पूर्ण झालेल्या सर्व मालिका समाविष्ट आहेत. 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियात 2-1 ने मिळवलेल्या विजयाचे निकाल काढून टाकल्यामुळं भारत कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरला.
-
Pat Cummins – the captain with the golden touch ✨
— ICC (@ICC) May 3, 2024
Australia crowned No.1 Test team after Annual Men's Rankings update ➡️ https://t.co/Mv1XCdDp7U pic.twitter.com/Bj1Drd2MK4
भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा किती गुणांनी मागे : आता ऑस्ट्रेलियन संघानं भारताला मागे टाकत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलंय. भारत (120 गुण) कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया (124) पेक्षा फक्त चार गुणांनी मागे आहे, तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडपेक्षा 15 गुणांनी पुढं आहे. दक्षिण आफ्रिका (103 गुण) 100 पेक्षा जास्त गुण मिळवणारा चौथा संघ आहे.
नऊ संघांचा क्रमवारीत समावेश : आता केवळ नऊ संघांचा कसोटी क्रमवारीत समावेश करण्यात आलाय. कारण अफगाणिस्तान आणि आयर्लंड हे संघ क्रमवारीत समाविष्ट होण्यासाठी आवश्यक तेवढ्या कसोटी सामने खेळत नाहीत, तर झिम्बाब्वेनं गेल्या तीन वर्षांत केवळ तीन कसोटी सामने खेळले आहेत. क्रमवारीत स्थान मिळवण्यासाठी संघाला तीन वर्षांत किमान आठ कसोटी सामने खेळावे लागतात.
एकदिवसीय आणि टी-20 क्रमवारीत अव्वल : वार्षिक अद्यतनानंतर भारत एकदिवसीय आणि टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. यामध्ये मे 2023 पूर्वी पूर्ण झालेल्या सामन्यांसाठी 50 टक्के गुण आणि त्यानंतर पूर्ण झालेल्या सामन्यांसाठी 100 टक्के गुणांचा समावेश आहे. भारताला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला असेल, परंतु त्यांनी आपली आघाडी तीनवरुन सहा गुणांवर वाढवलीय. भारताचे 122 गुण आहेत. टॉप-10 मध्ये कोणताही बदल झालेला नाही. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियासोबतचं अंतर कमी केलं असून ते आता 8 वरुन 4 गुणांवर आलंय.
कोणता संघ कोणत्या स्थानावर : टी-20 क्रमवारीत ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडला मागं टाकून दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय. परंतु, 264 रेटिंग गुण मिळवणाऱ्या भारतीय संघापेक्षा 7 गुणांनी मागं आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ चौथ्या स्थानावर असून इंग्लंडपेक्षा दोन गुणांनी पिछाडीवर आहे. न्यूझीलंडचेही दक्षिण आफ्रिकेप्रमाणे 250 गुण आहेत, परंतु दशांश गणनेत ते मागे आहे. वेस्ट इंडिजचे 249 गुण आहेत. तसं पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावर असलेला इंग्लंड आणि सहाव्या क्रमांकावर असलेला वेस्ट इंडिज यांच्यात फक्त तीन गुणांचा फरक आहे. पाकिस्तान संघ दोन स्थानांच्या पराभवासह सातव्या स्थानावर घसरलाय.
गेल्या वर्षी भारतीय संघानं रचला होता इतिहास : गेल्या वर्षी भारतीय संघ क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 संघ बनण्यात यशस्वी ठरला होता. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या वनडे मालिकेत भारतीय संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 बनला होता. एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 विजेतेपद मिळवणारा भारत हा दुसरा संघ ठरला. याआधी केवळ दक्षिण आफ्रिकेचा संघच अशी कामगिरी करू शकला होता. 28 ऑगस्ट 2012 रोजी दक्षिण आफ्रिकेनं ही कामगिरी केली.
हेही वाचा :