सेंट किट्स WI Clean Sweep BAN : वेस्ट इंडिज आणि बांगलादेश क्रिकेट संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना 12 डिसेंबर रोजी सेंट किट्समधील वॉर्नर पार्कवर खेळला गेला. हा सामनाही यजमान करेबियन संघानं जिंकत पाहुण्या बांगलादेश संघाचा 3-0 नं क्लीन स्वीप केला आहे.
Leaving 2️⃣0️⃣2️⃣4️⃣ as CG United ODI Champions!🏆#WIvBAN | #WIHomeForChristmas pic.twitter.com/gyGLEoZvWj
— Windies Cricket (@windiescricket) December 12, 2024
वेस्ट इंडिजच्या संघामध्ये बदल : या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून विंडीज संघानं या मालिकेत अजिंक्य आघाडी मिळवली होती, त्यामुळं या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग 11 मध्येही बदल करण्यात आले होते. या सामन्यात 27 वर्षीय यष्टीरक्षक आणि डावखुरा फलंदाज आमिर जांगू याला वेस्ट इंडिज संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली आणि त्यानं सामना जिंकून देणारं शतक झळकावून संघ व्यवस्थापनाचा निर्णय पूर्णपणे सिद्ध केला. चौथ्या स्थानावर आलेल्या जांगूनं विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळं वेस्ट इंडिजचा संघही या मालिकेत क्लीन स्वीप करण्यात यशस्वी ठरला.
The highest successful run chase at Warner Park!🙌🏾
— Windies Cricket (@windiescricket) December 12, 2024
WI did that!🏆#WIvBAN #WIHomeForChristmas pic.twitter.com/4wq5L1DwqR
आमिर जांगू हा वेस्ट इंडिजचा पहिला खेळाडू : मालिकेतील शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघानं 5 विकेट गमावून 321 धावा केल्या होत्या, त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि 86 धावसंख्येपर्यंत 4 विकेट गमावल्या. येथून केसी कार्टीला आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या आमिर जंगूची साथ मिळाली आणि दोघांमध्ये 5व्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. केसी कार्टी 95 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर जंगूनं एका टोकापासून डावावर नियंत्रण ठेवत संघाला विजयाकडे नेण्याचं काम सातत्यानं केलं.
An ODI 💯 on debut for Amir Jangoo! Only the 2️⃣nd West Indian to do it. Pure class!🏏👏🏾👏🏾👏🏾#WIvBAN | #WIHomeForChristmas pic.twitter.com/HhPBP0m357
— Windies Cricket (@windiescricket) December 12, 2024
46 वर्षांनंतर झाली इतिहासाची पुनरावृत्ती : जांगूनं नाबाद माघारी परतलेल्या गुडाकेश मोतीसोबत सहाव्या विकेटसाठी 53 चेंडूत 91 धावांची नाबाद भागीदारी करून या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला विजय मिळवून दिला. आमिर जांगूनं 83 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं नाबाद 104 धावांची शतकी खेळी केली. यासह जांगू वनडे पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा 46 वर्षांनंतर पहिला वेस्ट इंडिजचा खेळाडू ठरला आहे.
SIgned, Sealed & delivered.🔥
— Windies Cricket (@windiescricket) December 12, 2024
Motie seals the 3-0 series win with a six!#WIvBAN | #WIHomeForChristmas pic.twitter.com/cXIPZchySs
वनडे सामन्यात वेस्ट इंडिजनं गाठलं 300 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य : वनडे क्रिकेटच्या इतिहासात वेस्ट इंडिजनं चौथ्यांदा 300 पेक्षा अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीपणे पार केलं आहे. वेस्ट इंडिजनं आतापर्यंत 2019 मध्ये आयर्लंड विरुद्ध डब्लिन येथे झालेल्या सामन्यात वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे ज्यात त्यांना 328 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. या सामन्यातील बांगलादेश संघाच्या फलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर कर्णधार मेहदी हसन मिराज, सौम्या सरकार, महमुदुल्लाह आणि झाकेर अली या फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली.
A stunning debut hundred from Amir Jangoo lifts the West Indies to a 3-0 ODI series clean sweep 🙌#WIvBAN 📝 https://t.co/HjIHFsVck5 pic.twitter.com/JFLJZf0y3B
— ICC (@ICC) December 12, 2024
हेही वाचा :