ETV Bharat / spiritual

Amalaki Ekadashi 2024: आज आमलकी एकादशी, काय आहे आवळ्याचं महत्त्व, कशी करावी पुजा? - Amalaki Ekadashi 2024

Amalaki Ekadashi 2024 : आमलकी एकादशीला श्री हरीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी आवळा उकळणं, आवळ्याच्या पाण्यानं आंघोळ करणं, आवळ्याची पूजा करण्याची पद्धत आहे.

Amalaki Ekadashi 2024: आज अमालकी एकादशी, काय आहे आवळ्याचं महत्त्व, कशी करावी पुजा?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 7:47 AM IST

हैदराबाद Amalaki Ekadashi 2024 : दरवर्षी एकूण 24 एकादशी येतात. यापैकी एक म्हणजे आमलकी एकादशी ही फाल्गुन शुक्लमध्ये येते. ही एकदाशी आज आहे. आवळा वृक्ष भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे. असं म्हणतात की, आवळा वृक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी स्वतः राहतात. त्यामुळं आमलकी एकादशीला श्री हरीच्या पूजेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

आमलकी एकादशीची तारीख आणि वेळ : आमलकी एकादशी 20 मार्च रोजी सकाळी 12:21 वाजता सुरु होईल आणि 21 मार्च रोजी पहाटे 02:22 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत 20 मार्च रोजी रंगभरी एकादशीचंही व्रत केलं जाणार आहे. रंगभरी एकादशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 20 मार्च रोजी सकाळी 6.25 ते 9.27 असा असेल.

आमलकी एकादशीच्या पूजेची पद्धत : आमलकी एकादशीच्या दिवशी पूजेपासून जेवणापर्यंत प्रत्येक कामात आवळा वापरला जातो. या दिवशी सकाळी स्नान करुन भगवान विष्णूचं ध्यान करुन व्रत करण्याची प्रार्थना करावी. यानंतर स्नान वगैरे करुन भगवान विष्णूची पूजा करावी. देवासमोर तुपाचा दिवा लावा. विष्णु सहस्रनामाचा पाठ करावा. पूजेनंतर आवळ्याच्या झाडाखाली नवरत्न असलेला कलश लावायला विसरु नका. आवळ्याचं झाड उपलब्ध नसल्यास श्रीहरीला आवळा अर्पण करावा.

  • फार कमी लोकांना माहित आहे, आज आमलकी एकादशीला रंगभरी एकादशीदेखील म्हटलं जाते. या दिवशी भगवान शिव आणि विष्णुची संयुक्त पूजा केली जाते. भगवान शंकराला गुलाल अर्पण करत जीवन आनंदाच्या रंगांनी भरावे, अशी प्रार्थना केली जाते.
  • आवळा दान करावा : या दिवशी आवळ्याच्या झाडाला धूप, दिवा, चंदन, रोळी, फुलं, अक्षत इत्यादी अर्पण करा. मग झाडाखाली गरीब किंवा गरजूला अन्नदान करा. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला स्नान करुन भगवान विष्णूची पूजा करुन कलश, वस्त्र आणि आवळा इत्यादी एखाद्या गरीबाला दान करावं, असं सांगितलं जातं.

( Disclaimer- ही माहिती केवळ धार्मिक मान्यतेनुसार आहे. या लेखामधील कोणत्याही माहिती किंवा मान्यतेची ईटीव्ही भारत पुष्टी करत नाही)

हेही वाचा :

  1. सफला एकादशी 2024 : नवीन वर्षातील पहिल्या एकादशीला 'या' पद्धतीनं करा भगवान विष्णूची पूजा
  2. संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात; 9 डिसेंबरला कार्तिकी एकादशी तर 11 डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा, जाणून घ्या कसा असेल कार्यक्रम !

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.