ETV Bharat / politics

"मोदींना सत्तेत येण्यापासून रोखण्याची कुणाचीही हिंमत नाही, निवडणुकीनंतर काँग्रेससह इंडिया आघाडीचं..."- योगी आदित्यनाथ - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 19, 2024, 7:39 AM IST

Updated : May 19, 2024, 8:41 AM IST

Yogi Adityanath Palghar Sabha Speech : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं विसर्जन करावं लागेल. तसंच ही निवडणुकीची लढाई रामभक्त विरुद्ध रामद्रोही अशी असल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले. लोकसभा निवडणुकीचे पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार असून या पार्श्वभूमीवर योगींनी हे वक्तव्य केलंय. ते पालघरमधील प्रचारसभेत शनिवारी बोलत होते.

CM Yogi Adityanath Criticized Congress INDIA alliance in Palghar Sabha Speech
इंडिया आघाडी आणि योगी आदित्यनाथ (ETV Bharat)

पालघर Yogi Adityanath Palghar Sabha Speech : पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इंडिया आघाडीवर कडाडून टीका केली.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ? : यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना योगी म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्लाचं लोकार्पण केलंय. त्यामुळं या देशात मोदींची सत्ता येण्यापासून रोखण्याची हिम्मत कोणाही ‘माय का लाल’मध्ये नाही. मोदी हे खरे रामभक्त असून या निवडणुकीत भाजपाला चारशेहून अधिक जागा मिळतील", असा विश्वास योगींनी व्यक्त केला. "भाजपाला चारशेहून अधिक जागा मिळण्याच्या शक्यतेमुळं ‘इंडिया’ आघाडी चे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, लालूप्रसाद यादव या सर्वांच्या पायाखालची वाळू घसरायला लागलीय. त्यामुळं ते काहीही बोलत असले, तरी त्यांच्याकडं लक्ष येऊ नका. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं विसर्जन करावं लागेल," असा इशाराही योगींनी दिला.

उत्तर प्रदेश-महाराष्ट्राचं वेगळं नातं : पुढं ते म्हणाले की, "उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचं वेगळं नातं आहे. काशीमध्ये मराठा घाट असून महाराष्ट्रातील भोसले राज्यकर्त्यांनी तेथे विविध सुविधा उपलब्ध केल्यात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यासाठी काशीचे गागाभट्ट आले होते. त्यामुळं उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे परस्परांशी नाते आहे. कुणी काही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी अजिबात बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे धडे प्रत्यक्षात आणणाऱ्या पंतप्रधान मोदींना निवडून देण्यासाठी महाराष्ट्रानं महत्त्वाची भूमिका बजवावी", असं आवाहनही त्यांनी केलं.

...तर सहा महिन्यात पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल : "काँग्रेसची सत्ता असताना पाकिस्तानातून हल्ले केले जात होते. काँग्रेसला प्रश्न विचारल्यावर ते सांगायचे की दहशतवादी सीमापार आहेत. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर हे चित्र बदललं. आता पाकिस्तानला वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिलं जातंय. आता पाकव्याप्त काश्मीर वाचवणंही पाकिस्तानला कठीण जातंय. तुम्ही नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा. पुढच्या 6 महिन्यात पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग झाल्याचं तुम्हाला दिसेल", असा दावाही योगींनी यावेळी केला.

माफियांवर बुलडोझर : "गेल्या सात वर्षांत उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली झाली. पूर्वी व्यापारी आणि मुलींना धमकावलं जायचं. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार केला जायचा. लूट केली जायची. सत्तेत सहभागी असलेल्या लोकांचा माफियांना पाठिंबा होता. मात्र, आपल्या काळात अशा माफियांना आपण वठणीवर आणलं असून त्यांच्यावर बुलडोजर फिरवलाय", असंही योगींनी सांगितलं. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, खासदार राजेंद्र गावीत, रवींद्र फाटक, राजेश शहा, राणी द्विवेदी, महेंद्र पाटील, राजन नाईक, स्नेहा दुबे आणि नंदकुमार पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत, त्यामुळे काँग्रेसला पाडा - योगी आदित्यनाथ - Yogi Adityanath In Malegaon
  2. लोकसभा प्रचारासाठी विदर्भात योगी आणि मोदींच्या सभांचा धडाका, भाजपाला मोठा फायदा होणार; फडणवीसांचा दावा - Lok Sabha Election 2024
  3. "भाजपाला मत द्या अन् थेट अयोध्येला...", लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांची मतदारांसाठी स्पेशल ऑफर - Lok Sabha Election 2024

Last Updated : May 19, 2024, 8:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.