अमरावती Yashomati Thakur On Anil Bonde : मोर्शी मतदारसंघात घाण करून ठेवल्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या एका साध्या मुलाने त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला. आता कोणाबद्दल काहीही बोलायचं, दंगली घडवायच्या हा उद्योग अनिल बोंडे यांनी केला. अशा दंगली घडविण्याच्या उद्योगातूनच त्यांना खासदारकीचं बक्षीस मिळालं अशी टीका आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
बोडे यांचे काँग्रेसबाबत अनुद्गार : तिवसा येथे एका कार्यक्रमादरम्यान राज्यसभा सदस्य अनिल बोंडे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची तुलना ही डुकरांसोबत केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध केला जात आहे. अनिल बोंडे हे विरोधकांवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अपमानास्पद बोलतात अशी टीका त्यांच्यावर सातत्याने होते. याआधी त्यांनी मुख्यमंत्र्यांना बेडूक म्हटलं होतं. आता काँग्रेसवाल्यांना डुक्कर म्हणत आहेत. कुठलेही कारण नसताना वाद विवाद करून चर्चेत राहण्यासाठी अनिल बोंडे काहीही बोलत असतात, असं देखील आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय.
अनिल बोंडे यांची मेंटल हॉस्पिटलमध्ये नोंद: महिलांबाबत अपमानास्पद बोलणं हे अनिल बोंडे यांच्या पक्षाची संस्कृती आहे का? असा सवाल आमदार यशोमती ठाकूर यांनी केलाय. अनिल बोंडे यांच्या वागण्या बोलण्याची लक्षणे पाहून आमच्या युवक काँग्रेसने त्यांच्या नावाची मेंटल हॉस्पिटलमध्ये नोंद करून ठेवली आहे. आता तर स्वतः अनिल बोंडे हे त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी गडबड आहे हे सिद्ध करून दाखवत असल्याचं देखील आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय.
मानसोपचार रुग्णालयासमोर आंदोलन : यशोमती ठाकूर यांच्या विरोधात उलट-सुलट बोलून वातावरण खराब करणाऱ्या डॉ. अनिल बोंडे यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून त्यांच्यावर इलाज करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, असं म्हणत युवक काँग्रेसच्या वतीनं 20 एप्रिल 2022 रोजी शहरातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत देशमुख यांच्या मानसोपचार रुग्णालयासमोर आंदोलन केलं होतं.
हेही वाचा -