ETV Bharat / politics

"जिथे जातात तेथे पक्षाचा नाश करतात...", विनायक राऊत यांची राणेंवर टीका - Vinayak Raut On Rane

शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे ,निलेश राणे आणि नारायण राणे यांच्यावर निशाणा साधलाय.

VINAYAK RAUT ON RANE
विनायक राऊत यांची टीका (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2024, 10:56 PM IST

Updated : Oct 4, 2024, 11:03 PM IST

कोल्हापूर : भाजपा हा वेगवेगळ्या पक्षातील लोकांना विकत घेऊन बनवलेला पक्ष आहे. भाजपा हा भाडोत्री लोकांचा पक्ष झाला असून आता सर्वजण आपापल्या घरी जाऊ लागले आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली. हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील पक्षप्रवेशावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसंच राणे कुटुंबावर देखील राऊत यांनी सडकून टीका केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शिवसेना (ठाकरे गट) ॲक्टिव्ह मोडमध्ये आली आहे. कोल्हापूर उत्तरची जागा मिळविण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही असून, तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने मिरजकर तिकटी येथे 25 फूट उंच मशाल उभी केली असून याचे उद्घाटन माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

विनायक राऊत यांची टीका (Source - ETV Bharat)

राणे कुटुंबावर टीका : निलेश राणे भाजपामधून बाहेर पडण्याची चर्चा सुरू आहे. या संदर्भात प्रश्न विचारला असता विनायक राऊत म्हणाले, "ही ब्याड भाजपामधून जात असेल, तर चांगलंच आहे. ते जिथे जातात तेथे पक्षाचा नाश करतात. नितेश राणे ,निलेश राणे आणि नारायण राणे यांना विकृती शब्द लागू होतो. केंद्रीय मंत्री आणि खासदार राहिलेला माणूस घरात घुसून ठार मारण्याची भाषा करतो. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही."

काँग्रेस नेते आपला शब्द पूर्ण करतील : "गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा आमदार कोल्हापुरात उत्तरमधून निवडून आलेला आहे. उत्तरच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेनुसार यंदाच्या निवडणुकीत उत्तरची जागा ठाकरे गटाला मिळेल, असा शब्द काँग्रेस नेत्यांनी दिला. काँग्रेस नेते आपला शब्द पूर्ण करतील याची खात्री आहे. आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचा भगवा उत्तरमध्ये फडकेल आणि जिंकून ही येईल," असं विनायक राऊत म्हणाले. तसंच राधानगरी, कोल्हापूर उत्तर, शिरोळ, शाहूवाडी या मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा हक्क आहे आणि तो हक्क मिळावा. सोबतच हातकणंगले आणि चंदगडमध्ये सुद्धा आमचे तगडे उमेदवार आहेत, यासाठी या जागा सुद्धा आम्हाला सोडाव्यात, अशी मागणी केली असल्याचं विनायक राऊतांनी यावेळी सांगितलं.

गद्दारीचा शिक्का पुसून काढायचा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये इन्कमिंग सुरू आहे. तसंच शिवसेना ठाकरे गटामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत आहे. मात्र, गद्दारांना इन्कमिंग बंद असणार आहे. या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवावाच लागणार आहे. या महाराष्ट्राला दुर्दैवानं गद्दारीचा शिक्का लागला आहे ते विधानसभेत पुसून काढण्याचं काम करावं लागणार असल्याचं विनायक राऊत म्हणाले. गद्दारी केलेल्या कोणत्याही नेत्याला शिवसेना ठाकरे गटाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. निष्ठावंतांच्या जोरावर महाराष्ट्रात मशाल पेटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

  1. राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा तडकाफडकी रद्द, नेमकं कारण काय? - Rahul Gandhi Kolhapur Visit
  2. 'लाडक्या बहिणीं'साठी इतर योजनांचा निधी वळवला! योजनांवर नेमका किती खर्च? - ladki bahin yojana
  3. ऐतिहासिक वास्तूंच्या नुकसानीनंतर 2 वर्षांचा तुरुंगवास; मंत्रिमंडळाने घेतले 41 निर्णय - State Cabinet Meeting Decision

Last Updated : Oct 4, 2024, 11:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.