Post Workout Meal: हेल्दी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तरुण तासणतास जिमध्ये किंवा घरीच वर्कआउट करतात. वर्कआऊट केल्यानंतर एनर्जी डाऊन होते. त्यासाठी आहारत प्रोटीन, व्हिटॅमिन, कार्बोहार्ड्रेट तसंच फायबर्स युक्त पदार्थांचं सेवन करणं फार गरजेचं आहे. वर्कआउटनंतर त्वरीत ऊर्जा देणारे पदार्थ सेवन केल्यास तुम्ही दिवसभर ताजेतवाणे राहू शकता. याकरिता हेल्दी पदार्थांचं सेवन करावं लागतं. सुप्रसिद्ध डायटीशियन जयश्री वणिक यांच्या मते, वर्कआऊटनंतर काही पदार्थ खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. ज्यामुळे स्नायूंची दुरुस्ती आणि विकास होण्यास मदत होते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवाही कमी होतो. जाणून घ्या, वर्कआउटनंतर कोणते पदार्थ खावेत.
- होल ग्रेन ब्रेड आणि कडधान्ये: वर्कआउटनंतर होल ग्रेन ब्रेडसोबत डाळी खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. हे अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. या प्रकारच्या ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेट, फायबर आणि प्रथिने भरपूर असतात. याशिवाय, चणे, मूग आणि मसूर यासारख्या डाळींमध्ये प्रथिने आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. जे पोट भरण्यासोबतच वजन कमी करण्यास मदत करते. कारण ते खाल्ल्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटते आणि तुम्ही अतिरिक्त खाणं टाळता.
- ड्राय फ्रूट्स: वर्कआउटनंतर काजू, बदाम आणि अक्रोड यांसारखे ड्राय फ्रूट्स खाल्ल्यानं स्नायू रिकव्हर होण्यास मदत होते आणि एनर्जी वाढते. या ड्रायफ्रूटमध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्वे, फायबर, ओमेगा ३ फॅटी ॲसिड आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. जे आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता.
- उकडलेली अंडी: अंड्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. तसंच याच्या सेवनानं जास्त भूक लागत नाही आणि जास्त वेळपर्यंत पोट भरल्यासारखं वाटते. असल्यासारखं जाणवते. त्यामुळे वर्कआउट केल्यानंतर त्याचे सेवन केल्याने ऊर्जा मिळण्यास मदत होते.
- ओट्स: ओट्स शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. प्रथिने, फायबर आणि कर्बोदकांसाठी ओट्स हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. याच्या सेवनामुळे झटपट ऊर्जा मिळते आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे व्यायामानंतर तुम्ही ते खाऊ शकता.
- विविध प्रकारच्या बिया: यामध्ये पुरेशा प्रमाणात प्रथिने आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिडस् असतात. उदाहरणार्थ, अंबाडीच्या बिया, भोपळ्याच्या बिया, तीळ आणि चिया सीडसारख्या बीया खाल्ल्याने शरीराला पुरेसे पोषण घटक मिळतात. तसंच शरीर तंदुरुस्त, निरोगी आणि सक्रिय राहण्यास मदत होते.
- सातू आणि सोया मिल्क: हे दोन पदार्थ जिमनंतर तुमच्या शरीरासाठी महत्त्वाचे पोषक घटक पुरवतात. जे तुम्हाला त्वरित ऊर्जा प्रदान करतात.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
हेही वाचा
- तुम्हीही दुपारच्या जेवणात दही घेता काय? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- स्मरणशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे काळे जिरे
- मधुमेहाच्या रुग्णांनी काय खावं? भात की चपाती, काय आहे सर्वोत्तम
- केस सुंदर आणि घनदाट हवेत? मेथी दाण्यापासून तयार केलेला हेअर मास्क वापरा
- केवळ पचनाच्या समस्यांपासून सुटका नाही तर लैंगिकता सुधारण्यासाठी सर्वोत्तम आहे वेलची